Supriya Sule | सुप्रिया सुळे ठरल्या देशाच्या राजकारणातील ‘कर्तृत्ववान महिला’

0
4
Supriya Sule
Supriya Sule

Supriya Sule | बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) ह्या अनेकदा संसद रत्न राहिलेल्या आहेत. दरम्यान, ‘इंडिया टुडे’ ने नुकताच एक सर्व्हे केलेला असून, यात देशभरातील शंभर कर्तृत्ववान महिलांची यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.  तसेच यात राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, व्यवसाय तसेच अन्य क्षेत्रांत कार्यरत असलेल्या संपूर्ण देशभरातील महिलांचा आणि त्यांच्या कामांचा अभ्यास करण्यात आला आहे.

दरम्यान, देशात राजकीय क्षेत्रात काम करत असताना मतदार संघातील नागरिकांच्या समस्या समजून घेत त्यांना योग्य टो न्याय देत आपल्या कर्तव्याच्या भूमिकेवर शंभर टक्के खऱ्या उतरत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी संसदेत ‘संसद महारत्न’ हा किताब पटकावला आहे. (Supriya Sule)

Deola | सभासदांचे हित हेच ‘प्रगती’चे हित; नवनिर्वाचित संचालकांची ग्वाही

सुप्रिया सुळे यांची संसदेतील उपस्थिती, चर्चासत्रांतील सहभाग, मांडलेले प्रश्न, खासगी विधेयके इत्यादि सर्वच स्तरांवर सुळे ह्या देशातील खासदारांच्या रांगेत अव्वल ठरल्या आहेत. दरम्यान, यामुळेच त्यांना सलग दोन वेळा ‘संसद महारत्न’, आणि सात वेळा ‘संसदरत्न’ ह्या पुरस्काराने सन्मानित केलेले आहे. तसेच याशिवाय अन्यही काही राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पुरस्कार हे खासदार सुप्रिया सुळे यांना आतापर्यंत मिळालेले आहेत. तर, त्यांच्या याच एकूण कार्याची दखल घेत ‘इंडिया टुडे’च्या देशभरातील कर्तृत्ववान महिलांच्या यादीत सुप्रिया सुळे यांचा समावेश करण्यात आलेला आहे. (Supriya Sule)

Uddhav thackrey | ‘मविआ’त वाद चिघळले; ठाकरे-काँग्रेसमध्ये खंडाजंगी..?

Supriya Sule| हा माझ्या मतदार संघातील लोकांचा बहुमान

दरम्यान, ‘इंडिया टुडे’ने जाहीर केलेल्या ह्या शंभर कर्तृत्ववान महिलांच्या यादीत सहभाग झाल्यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी याबाबत त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत. यावेळी त्या म्हणाल्या की, “माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येक नागरिकाचाच हा बहुमान आहे. तसेच देशातील अग्रगण्य मासिक ‘इंडिया टुडे’ ने जारी केलेल्या ‘टॉप १०० वुमन अचिव्हर्स ऑफ इंडिया’ या यादीत माझा समावेश करण्यात आला आहे याबद्दल मला आनंद आहे.”(Supriya Sule)

तसेच हा खूप मोठा बहुमान आहे. हे शक्य होण्याचे कारण म्हणजे माझ्या बारामती लोकसभा मतदार संघामधील जनतेने माझ्यावर हा विश्वास ठेवला आणि मला लोकसभेत प्रतिनिधित्व करण्याची तसेच त्यांची सेवा करण्याची ही संधी दिली. राष्ट्रवादी काँग्रेस, पवार साहेब व मतदार संघातील जनतेने माझ्यावर टाकलेल्या ह्या विश्वासाला पात्र ठरण्यासाठीच मी सदैव कार्यरत राहील. (Supriya Sule)


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here