टाकेद परिसरात बिबट्या जेरबंद ; इगतपुरी वन विभागाला यश

0
5

राम शिंदे
सर्वतीर्थ टाकेद : इगतपुरी तालुक्यातील राहुलनगर बारशिगवे येथे बिबट्याला जेरबंद करण्यात इगतपुरी वन विभागाला अखेर यश आले आहे. राहुलनगर येथील दुर्गा देवी टेकडी येथे या बिबट्याला वनविभागाने जेरबंद करून ताब्यात घेतले असून सदर बिबट्याला इगतपुरी येथे नेण्यात आले असल्याचे सांगितले.

इगतपुरीचे प्रादेशिक वनपरिक्षेत्र अधिकारी केतन बिरारीस, वन परिमंडळ अधिकारी भाऊसाहेब राव यांच्या नेतृत्वाखाली वनरक्षक स्वाती लोखंडे, गोरख बागुल, फैजअली सैय्यद, माऊली तसेच वनमजुर दशरथ निर्गुडे, गोविंद बेंडकोळी, भोरु धोंगडे, धोंडीराम पेढेकर, पूनाजी कोरडे, अर्जुन मदगे यांनी ह्या बिबट्याला जेरबंद करण्याच्या मोहिमेत सहभाग घेतला.

सदर बिबट्याने काही दिवसांपूर्वीच वासाळी येथील कचरवाडी शिवारात एका शेतकऱ्याच्या नऊ शेळ्या ठार केल्या होत्या. त्यानंतर दोन दिवसांपूर्वी वासाळी गावात देखील सदर बिबट्याने दहशत माजवली होती.या दहशतिने परिसरातील झापवस्तीसह गाव वसाहती मध्ये राहणाऱ्या शेतकरी ग्रामस्थांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले होते. परंतु नुकत्याच ताब्यात आलेल्या बिबट्याला ट्रॅक्टरद्वारे इगतपुरी वनविभाग ऑफिस येथे नेण्यात आल्याने स्थानिक शेतकऱ्यांच्या जीवात जीव आला आहे.

इगतपुरी तालुक्यात विविध गावांमध्ये बिबट्या असून त्यामुळे नागरिक त्रस्त आहेत.तरी ज्या ठिकाणी बिबट्याची दहशत आहे अश्या ठिकानावरील शेतकरी ग्रामस्थांनी स्वतःचे रक्षण करावे रात्रीच्या दरम्यान कुठेही फिरू नये व मदतीसाठी वनविभागाच्या अधिकारी वर्गाला तात्काळ संपर्क साधावा असे आवाहन वन विभागाचे अधिकारी चेतन बिरारीस यांनी तालुक्यातील ग्रामस्थ नागरिकांना केले आहे. आजच्या घटनेमुळे ग्रामस्थांनी वन खात्याचे आभार मानले आहेत.

 


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here