जगातील सर्वात उंच रेल्वेपुलाचे फोटो समोर; वर्षाखेरीस होणार उद्घाटन

0
1

नवी दिल्ली –  जगातील सर्वात उंच रेल्वेपुल असलेल्या चिनाब पुलाचे बांधकाम पूर्ण झाले असून रेल्वे ट्रॅक टाकण्याचे काम अजून बाकी आहे. येत्या वर्षाखेरीस ह्या पुलाचे उद्घाटन होणार आहे.

ट्विटरवर भारतीय रेल्वेने ह्या पुलाचे फोटोज शेअर केले आहेत, ज्यात पुलावरून निसर्गाचे अप्रतिम असे सौंदर्य दिसत आहे. या पुलाचे बांधकाम कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड यांनी केले आहे.

 

हा पूल १.३१५ किलोमीटर इतका लांब असून त्याची उंची ३५९ मीटर आहे. म्हणजे हा पूल पॅरिसच्या आयफेल टॉवरपेक्षा ३५ मीटर उंच आहे. त्यामुळे, हा पूल जगातील सर्वात उंच आर्क पूल आहे.

कटरा-बनिहाल रेल्वे सेक्शनवर हा पूल बांधला जात असून ज्याची अंदाजे किंमत २९,७४५ कोटी रुपये आहे. तसेच, हा पूल उधमपूर-कटरा-कांजीगुंडला जम्मूशी जोडेल. विशेष म्हणजे, ह्या पुलाच्या स्ट्रक्चरल डिटेलिंगसाठी ‘टेकला’ सॉफ्टवेअरचा वापर करण्यात आला आहे. यामध्ये वापरलेले स्ट्रक्चरल स्टील मायनस १० ते ४० डिग्री सेल्सिअस इतक्या तापमानाला तोंड देऊ शकते. तसेच, ह्या पुलाच्या कमनीचे एकूण वजन १०,६१९ मेट्रिक टन असून रेल्वेने प्रथमच ही कमान केबल क्रेनद्वारे उभारण्यात आली आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here