दिल्ली – गेल्या २४ तासांत तीन मोठ्या भूकंपासह एकापाठोपाठ एक भूकंपाच्या धक्क्यांनी तैवान देश हादरला आहेत. त्यामुळे जपानवर त्सुनामीचे संकट निर्माण झाले आहे.
तैवानच्या हवामानशास्त्र ब्युरोने सांगितले की, भूकंपाचा केंद्रबिंदू आग्नेय दिशेला असलेल्या तैतुंग काउंटीमध्ये दिसत होता. याच भागात शनिवारी ६.४ रिश्टर स्केल, रविवारी सकाळी ६.८ रिश्टर स्केल, व नंतर दुपारी याच भागात ७.२ रिश्टर स्केल भूकंपाचे धक्के बसले होते. ज्याचा परिणाम ताइतुंगच्या पृष्ठभागापासून १० किलोमीटर अंतरावर झाला होता. त्यामुळे तैवान देशाचे बरेच नुकसान झाले आहे.
दरम्यान, या भूकंपामुळे तैवानमध्ये अनेक ठिकाणी रस्त्यांना तडे गेले, पूल तुटली, रेल्वे रुळावरून घसरल्या आहेत. तसेच, अनेक भागांतील इमारती जमीनदोस्त झाल्या असून त्यांना बाहेर काढण्याचे शर्तींचे प्रयत्न सुरू आहेत. यावेळी तिथल्या पुलाला तडे गेल्याने अनेक वाहने रस्त्यांवर कोसळली. एकूणच तैवानमधल्या तिन्ही भूकंपाच्या धक्क्यांनी राजधानी तैपेईतील इमारतीही काही काळ डळमळीत झाल्या होत्या. पण ताइनान आणि काओसांग भागात भूकंपाचा फारसा परिणाम झाला नाही. ह्या व्हिडियोतून तिथली विध्वंसता तुम्ही पाहू शकता.
दरम्यान, या भूकंपानंतर संयुक्त राष्ट्र पॅसिफिक त्सुनामी चेतावणी केंद्राने तैवानमध्ये त्सुनामीचा इशारा जाहीर केला आहे. तर दुसरीकडे, जपानच्या ओकीनावामध्येही भूकंपाचे धक्के बसल्याने तिथल्या हवामान खात्यानेही त्सुनामीचा इशारा दिला असून तिथे ३.२ फूट उंच लाटांचा इशारा दिला आहे.
तैवान देश हा रिंग ऑफ फायर क्षेत्रात येतो, म्हणजे हा असा प्रदेश आहे जिथे सर्वाधिक नैसर्गिक आपत्ती होतात. वास्तविक, तैवान दोन टेक्टोनिक प्लेट्सच्या अगदी जवळ वसलेले आहे. ज्यामुळे या दोघांमध्ये कोणत्याही प्रकारची हालचाल झाली तरी तैवानला भूकंप आणि त्सुनामीचा धोका असतो. याआधी २०१६ मध्ये झालेल्या भूकंपात १०० लोकांचा मृत्यू झाला होता, तर १९९९ मध्ये झालेल्या भूकंपामुळे २००० लोकांचा मृत्यू झाला होता.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम