देवळा- अतिवष्टीमुळे शेतकरी हतबल; सरसकट पंचनाम्याची मागणी

0
2
पावसामुळे घोड्याची आडी आदिवासी वस्तीवर घराची पडलेली भिंत

देवळा : तालुक्यात गेल्या महिन्याभरापासून पावसाने कहर केला असून शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे मात्र प्रशासन याकडे लक्ष देवून पंचनामे करणार का ? याकडे शेतकऱ्यांचे डोळे लागून आहेत. तालुक्यात झालेल्या अतिवष्टीमुळे अनेक पिकांमध्ये पाणी असल्याने उत्पन्नात घट होण्याची शक्यता वाढली आहे. यामुळे तालुक्यांतील शेतकऱ्यांनी सरसकट पंचनामा करण्याची मागणी केली आहे. तसेच तहसीलदार महोदयांनी स्वतः पाहणी करावी ही मागणी जोर धरू लागली आहे.

कांदा रोपाचे नुकसान…

यावर्षी कांद्याला भाव नाही मात्र आता शेतकऱ्यांची लाल कांदे लागवड काही ठिकाणी सुरू आहे , सततच्या पावसाने कांदा लागवडीस उशीर होत असल्याने अनेक शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून कांदा रोप सडले आहे. यामुळे लाल कांदा लागवड करायची केव्हा हा प्रश्न निर्माण झाला आहे. उन्हाळी कांद्याचे बी नुकतेच अनेक शेतकऱ्यांनी टाकले तेव्हापासून पाऊस सुरू असून बियाणे जमिनीतून उगवले नसल्याची परिस्थिती अनेक ठिकाणी उद्भवले आहे, मका, सोयाबीन या पिकांना देखील मोठा फटका बसला आहे . बाजरी कापणीस आली असल्याने पावसाने 100 टक्के नुकसान झाले आहे. तालुक्यातील वार्शी, हनुमंतपाडा भागात पावसाने सुरवातीपासून धुमाकूळ घातला आहे. अनेक शेतकऱ्यांचे मका पीक देखील खराब झाले त्याचसोबत इतर पिकांना देखील मोठा फटका बसला आहे.

अतिृष्टीमुळे शेतकरी उध्वस्त झाला आहे. शासनाने लक्ष द्यावे शेतकऱ्यांच्या डोळ्यातील अश्रू पुसावे अन्यथा शेतकरी उभा राहणे कठीण होईल, नवीन कांदा रोप पुर्ण जमिनदोस्त झाले आहे आणि जुन्या कांद्याचा तर नसल्याने खर्च निघत नाही. महाराष्ट्र सरकारने सरसकट पंचनामे करावेत आणि कांदा उत्पादक शेतकर्यांना क्विंटल 800 रुपये अनुदान द्यावे, तालुक्यात ओला सरसकट पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी.
भगवान जाधव, मकरंदवाडी सुभाषनगर

कांदा सडला तरी भाव वाढत नाहीत याकडे सरकारने गांभिर्याने बघावे. अतिवृष्टीमुळे साठवलेला उन्हाळी कांदा सडत चालला आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी ६/७ महीने चाळीत साठवलेल्या कांदा खराब होत असल्याने लाखो रुपयांचे नुकसान होत आहे, दुसरीकडे पोळ कांद्याची रोपे, कोबी, फ्लॉवर या पिंकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शासनाने बोटचेपे धोरण थांबवून तात्काळ पंचनामे करावेत.
कुबेर जाधव , विठेवाडी

अतिवृषटीमुळे वार्शी, हनुमंतपाडा भागात गेल्या 15 दिवसात प्रचंड नुकसान झाले असून शेतात पाणी साचल्याने उभे पीक सडले आहे. यामुळे या सहामाहीत शेतकऱ्यांचे उत्पन्न घटले आहे. कांदा बियाणे , कोबी, तुर, सोयाबीन हे पीक पूर्णतः खराब झाले असून प्रशासनाने तात्काळ पंचनामे करावेत, आदिवासी वस्तीवर घरांची पडझड देखील झाल्याची माहिती आहे. या भागात तहसीलदार महोदयांनी स्वतः पाहणी करून शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घ्यावात.
ललित सोनवणे, वार्शी

पावसामुळे घोड्याची आडी आदिवासी वस्तीवर घराची पडलेली भिंत

 

सततच्या पावसाने पिकांवर किडीचा प्रादुर्भाव वाढला आहे. कोबी, वाल तसेच अन्य भाजपाला पिकांवर प्रचंड अळीचे प्रमाण वाढले आहे. उन्हाळी कांद्याचे रोप टाकले मात्र पावसाने मर रोग अती प्रमाणात वाढला आहे, यामुळे दुबार बियाणे टाकण्याची वेळ आली आहे. शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे. यामुळे शासनाने तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा.
– पोपट जिभाऊ पवार, भऊर

खर्डे परिसरात पावसाची सतत धार चालू आहे यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. अनेक लाल कांद्याची लागवड केली असून पावसाने हे पीक पूर्णपणे खराब झाले आहे, कांद्याचे रोप देखील खराब झाले आहे , आर्थिक फटका शेतकऱ्यांना बसत आहे. शेतकरी अडचणीत असताना शासनाने सरसकट नुकसान भरपाई देवून शेतकऱ्यांना आधार देणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांच्या बांधावर जावून शेतीची पाहणी करावी, शासकीय सोपस्कार न पार पाडता मनापासून मदत करावी.
विजय जगताप , खर्डे


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here