पालखेड – करंजवन धरणांतून विसर्ग वाढवला ; म्हेळूस्के पूल पाण्याखाली

0
1

वैभव पगार | म्हेळूस्के
दिंडोरी तालुक्यात आज सकाळपासून पडत असलेल्या संततधार पावसामुळे नदी नाल्याला मोठ्या प्रमाणात पूर आला असून शेतातील पिकांन मध्ये मोठ्या प्रमणात पाणी साचले असल्यामुळे शेतकरी वर्गा मध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

आज सकाळपासून पडणाऱ्या पावसामुळे तालुक्यातील धरण साठ्यामध्ये कमालीची वाढ होत असल्यामुळे आज सांयकाळी सायं. ०८:१५ वा. करंजवण धरण विसर्ग कादवा नदीपात्र १२६८० होता तो वाढवून १६४६० क्युसेक्स क्युसेक्स इतका पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला असून त्यामुळे कादवा नदीवरील ओझे करंजवण तसेच म्हेळुस्के – लखमापूर गावांना जोडणारा कादवा नदीवरील पुल पाण्याखाली गेल्यामुळे येथील गावाचा संपर्क तुटला आहे.

पालखेड धरणातून बारा हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग कादवा नदी सोडला आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास पुन्हा टप्प्याटप्प्याने पाण्याचा विसर्ग वाढविण्यात येणार आहे तरी नदी काठावरील गावानी काळजी घ्यावी असे अवाहन करंजवण धरण शाखा अभियंता भालके व पालखेड धरण शाखा अभियंता सानप यांनी केले आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here