बँकेची फसवणूक केल्याप्रकरणी पोलिसांकडून दोघा संशयिताची अटक

0
2

नाशिक – नाशिकरोड मध्ये एका बँकेची ५.४ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी पोलिसांकडून दोघा संशयितांना अटक केली आहे.

एका बँकेत सदर आरोपींनी बँकेतील अपहारानंतर त्या बँक अधिकाऱ्याने नाशिकरोड पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध तक्रार दाखल केली होती. त्यानंतर संशयित आरोपींवर नाशिकरोड पोलिसांनी आयपीसी कलम ४०९ अन्वये एफआयआर नोंदवून गुन्हेगारांना अटक करण्यात आली आहे.

यावेळी दिलेल्या माहितीनुसार, नाशिकरोड परिसरातील विविध बँकांच्या एटीएममध्ये जमा झालेल्या रोकडचे रूट कस्टोडियन (रक्कमेच्या संरक्षणाची जबाबदारी असणारे) म्हणून या दोघांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यांनीच ही फसवणूक केली असल्याचे पोलिसांनी सांगितले.

ह्या दोघा आरोपींनी ८ जुलै ते ३० ऑगस्ट या कालावधीत प्रत्येक एटीएममध्ये कमी रक्कम भरली आणि अखेर एकाच महिन्यात ५.४२ लाख रुपये काढून घेतले. दरम्यान, बँक अधिकाऱ्यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्वरित त्यांनी दोघा संशयितांविरोधात तक्रार दाखल केली. सध्या पोलिसांकडून ह्या प्रकरणात अधिक तपास सुरु असल्याचे सांगितले.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here