Sushilkumar Shinde | मोठा गौप्यस्फोट..! माजी मुख्यमंत्र्यांना भाजपची ऑफर

0
40
Sushilkumar Shinde
Sushilkumar Shinde

Sushilkumar Shinde |  सध्या राज्याच्या राजकारणात अनेक राजकीय घडामोडी घडताना दिसत आहेत. आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय पटलावर सत्ताधारी आणि विरोधकांकडून एकमेकांना मात देण्यासाठीची चढाओढ सुरू आहे. तर, दोन्ही गटांच्या गोटात सध्या बळ वाढवण्यासाठी रस्सीखेच सुरू आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपूर्वीच दक्षिण मुंबईतील काँग्रेसचे माजी खासदार मिलिंद देवरा यांनी शिंदे गटात प्रवेश केला असून, त्यांच्यापाठोपाठ आणखी काही काँग्रेसचे नेतेही सत्ताधाऱ्यांच्या गटात सामील होण्याची चर्चा होती. दरम्यान, महाराष्ट्रात काँग्रेसची पडझड होत असल्याची सांभाव्यता असतानाच आता राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. (Sushilkumar Shinde)

Big Breaking | आयोग-इडीसुद्धा ‘यांचे’च नोकर; ठाकरेंनी सरकारला घेरलं

ते म्हणाले की,”मला आणि माझी मुलगी प्रणिती शिंदे यांना भाजपमध्ये येण्यासाठी ऑफर देण्यात आली” असा दावा सुशीलकुमार शिंदे यांनी केला आहे. विशेष म्हणजे आज संध्याकाळी पाच वाजेच्या सुमारास भाजप नेते चंद्रकांत पाटील हे शिंदे यांची भेट घेणार आहेत. दरम्यान, या पूर्वीच शिंदे यांनी हा गौप्यस्फोटामुळे राजकीय वर्तुळात आता याबाबत चर्चा सुरू झाली आहे.

Sushilkumar Shinde | काय म्हणाले सुशीलकुमार शिंदे? 

“माझा दोन वेळा पराभव झाला असूनही, प्रणिती ताईला आणि मला भाजपकडून आमच्या पक्षात या असे सांगितले जात आहे. मात्र, आमच्या रक्तातच काँग्रेस आहे. आम्ही काँग्रेस सोडून जाणार नाही.” असे ते यावेळी म्हणाले. अक्कलकोट तालुक्यातील बोरोटी येथे ‘हूरडा पार्टी’ दरम्यान कार्यकर्त्यांशी बोलताना सुशीलकुमार शिंदे हे म्हणाले होते.

“मी आता ८३ वर्षाचा आहे. त्यामुळे आता मी दुसऱ्याचं बरोबर आहे, असं कसं म्हणणार. प्रणिती ही पक्षीय बदलाच्या भानगडीत पडणार नाही. राजकारणात असे पराभव होत असतात. पंडित जवाहरलाल नेहरू सारख्या माणसासोबत असं झालं. मात्र, परभवाच्या बाबतीत पंडित नेहरू यावेळी म्हणाले होते की, ‘लहान मुलाला आधार देऊनच सुरुवातीला चालवावे लागते. नंतर मग तो स्वतः चालत असतो.(Sushilkumar Shinde)

Uddhav Thackrey | …अन् ठाकरेंच्या परिषदेत लावला ‘तो’ व्हिडिओ

चालतानाही तो पडतो पुन्हा उठतो, पुन्हा पडतो. मात्र, मग तो जेव्हा चालायला लागतो. तेव्हा मग तो पुन्हा कधी पडत नाही’. त्यामुळे तुम्ही काहीही काळजी करू नका, आज वाईट दिवस आहेत, मात्र हे दिवसही निघून जातील”, अशा शब्दांत सुशीलकुमार शिंदे यांनी यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांना संबोधित केले. दरम्यान, यामुळे आता राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे.(Sushilkumar Shinde)


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here