Shocking information came from the terrorists : पुण्यात एटीएसच्या हाती लागलेल्या दोन दहशतवाद्यांकडे राज्यातील विविध ठिकाणच्या चित्रीकरणासह पीडीएफ व नकाशांसह एकूण ५०० जीबी डेटा आढळला असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. त्यांच्याकडून ड्रोनही ताब्यात घेण्यात आले आहेत, पण ते कुठे वापरण्यात आले, हे अद्याप कळू शकलेले नाही.
पुण्यातून दोन दहशतवाद्यांना एटीएसने अटक केली. ते तीन साथीदार असून त्यातील एकाचा अद्याप शोध लागलेला नाही. एटीएसने तपास केला असता तिन्ही दहशतवाद्यांनी महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये रेकी करून पुण्यासह इतर ठिकाणचे गुगल स्क्रीन शॉट्स घेऊन ठेवले आहेत. त्यामागचा उद्देश्य अद्याप कळू शकलेला नाही. हाती लागलेले दोन्ही दहशतवादी पूर्णपणे ब्रेनवॉश केलेले आहेत. ते अलसफा नावाच्या दहशतवादी संघटनेशी जुळलेले आहेत. गेल्या तीन ते चार वर्षांपासून ते त्यांच्या संपर्कात आहेत. त्यांच्याजवळ जिहादशी संबंधित व्हिडियो, पुस्तके, युट्यूबवरील भाषणे, पीडीएफ कागदपत्रे आदी गोष्टी आढळल्या.
https://thepointnow.in/death-thread/
मोहम्मद इम्रान युनूस खान आणि युनूस याकुब साकी हे दोघेही मध्य प्रदेशातील रतलाम येथील मूळ रहिवासी असून त्यांना धर्मांध करण्याचे गेल्या काही वर्षांमध्ये जबरदस्त प्रयत्न करण्यात आले आहेत. त्यांच्याकडे आढळलेल्या लॅपटॉपची क्षमता ५०० जीबी एवढी असून त्यातही अनेक वादग्रस्त व्हिडियो आणि पुस्तकांचे पीडीएफ आहेत. त्यांच्याकडे असलेल्या मोबाईलमध्येही ५०० चित्रपट मावतील एवढा डेटा आढळला आहे.
सुरुवातीला महाराष्ट्रातील शहरांमध्ये काही ठिकाणी हॉटेल्समध्ये ते ओळख लपवून राहिले. परंतु, त्यानंतर त्यांनी प्लान बदलला आणि प्रत्येक शहरात ते तंबू ठोकूनच राहू लागले. सुनसाण भागामध्ये तंबूमध्ये राहून ते शहरात रेकी करत फिरायचे, अशी माहिती एटीएसच्या हाती लागली आहे.
दोन्ही दहशतवाद्यांनी आपली ओळख ग्राफिक डिझायनर म्हणून सर्वांना सांगितली. हीच ओळख सांगून ते पुण्यात राहायचे. पण मुळात तपास केला असताना दोघेही साधे बारावी पासही नव्हते अशी माहिती पुढे आली आहे. पुण्यात एटीएसच्या हाती लागलेल्या दोन दहशतवाद्यांकडे राज्यातील विविध ठिकाणच्या चित्रीकरणासह पीडीएफ व नकाशांसह एकूण ५०० जीबी डेटा आढळला असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. त्यांच्याकडून ड्रोनही ताब्यात घेण्यात आले आहेत, पण ते कुठे वापरण्यात आले, हे अद्याप कळू शकलेले नाही.
काही दिवसांपूर्वीच पुणे येथून डॉक्टर अदनान सरकार याला दहशतवादी कारवाया केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. त्यानंतर आणखी चौघा जणांना देखील अटक करण्यात आली होती. दरम्यान आता अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून अशा प्रकारची धक्कादायक माहिती समोर आल्यामुळे राज्यामध्ये खळबळ माजली आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम