Skip to content

Death threat : कोण आहे ही हरामखोर बाई म्हणत यशोमती ठाकुरांना जीवे मारण्याची धमकी


Death threat : काँग्रेसच्या आमदार यशोमती ठाकूर यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक अध्यक्ष – संभाजी भिडे यांच्या अमरावती येथील कार्यक्रमात महात्मा गांधींबद्दल(mahatma gandhi)  वादग्रस्त वक्तव्य करण्यात आले होते. या विरोधात काँग्रेसच्या आमदार यशोमती ठाकूर यांनी आक्रमक भूमिका (aggressive) मांडली होती त्यानंतर त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. ट्विटरच्या माध्यमातून त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

यशोमती ठाकूर यांना जीवे मारण्याची धमकी

दाभोळकर असाच ओरडत होता एक दिवस टराटरा फाडून जन्नत मध्ये पाठवला. टराटरा फाडून टाकला. हरामखोर बाई कोण आहे स्पष्ट करा, असं म्हणत यशोमती ठाकूर यांनी जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. दाभोळकर असाच ओरडत होता. एकदिवस जन्नतमध्ये पाठवला. धारकरी कोथळा बाहेर काढतात, हे लक्षात असू द्या, असं म्हणत ठाकूर यांना धमकावण्यात आलं आहे.

https://thepointnow.in/fatal-accident-of-car-container/

आपल्या तत्वांशी, विचारांशी तडजोड करू नका. लक्षात ठेवा इतिहास गद्दारांचा नाही तर लढणाऱ्यांचा लिहिला जातो. आज इतिहासाने आपल्यावर एक जबाबदारी सोपवलीय. आज जर आपण चुकलो तर हा देश आपल्याला माफ करणार नाही. देशाची लोकशाही टिकवायची असेल तर द्वेष पेरणाऱ्यांना थारा देऊ नका. जय हिंद!, हे ट्विट यशोमती ठाकूर यांनी केलं होतं. त्या ट्विटवर केलेल्या कमेंटमधून ही धमकी देण्यात

यशोमती ठाकूर यांच्या सुरक्षेत वाढ

दरम्यान जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्यानंतर आता यशोमती ठाकूर यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. धमकीनंतर ठाकूर यांच्याबाबत कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी यशोमती ठाकूर यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.

नेमकं काय होत यशोमती ठाकूरांच विधान

भारतातील थोर महापुरुष तसेच संतांबद्दल मनोहर कुलकर्णी ऊर्फ भिडे गुरुजी सतत काहीतरी बरळत असतो. त्याला तात्काळ अटक( arrest) करावी अशी फक्त आमचीच नाही तर समस्त लोकांची मागणी आहे. सरकार आमच्यावर गुन्हे (case) दाखल करु शकते पण मनोहर कुलकर्णी जो आताही बरळतच आहे त्याच्यावर कसल्याही प्रकारची कारवाई करताना दिसत नाही आहे यावरुनच त्यांचा हेतु काय हे स्पष्ट होते. ज्यांनी देशासाठी आपलं सर्वस्व अर्पण केलं त्या महापुरुषांची निंदानालस्ती भिडे कडुन सतत चालु आहे. त्याबद्दल सरकारमधील कोणीही बोलत नाही आहे. तुम्ही आमच्यावर कितीही गुन्हे दाखल केले तरी आम्ही जोपर्यंत भिडेवर (sambhaji bhide) कारवाई होत नाही तोपर्यंत शांत बसणार नाही.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!