Five cobra : बापरे… त्यांच्या घरात आढळले तब्बल पाच कोब्रा साप ; पुढे काय घडलं?

0
31

Five cobra : नाशिकच्या नवीन नाशिक भागातील एका घरामध्ये कोब्रा जातीच्या सापाची तब्बल पाच पिल्लं आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.(Five cobra snake’s found in house)

सध्या पावसाला सुरुवात झाली असल्यामुळे ठिकठिकाणी वन्य पशु, प्राणी यांचा वापर वाढल्याचे दिसून येत आहे. अनेक ठिकाणी घरांमध्ये साप निघण्याच्या घटना देखील या काळात मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत अशीच एक धक्कादायक घटना नाशिकच्या सिडको (cidco) परिसरात समोर आली आहे. सिडको परिसरातील पी नगर दोन मधील केवल पार्क या ठिकाणी एका रो हाऊस मध्ये कोब्रा(cobra) जातीच्या विषारी नागांची पाच पिल्लं आढळून आले आहेत. गजानन ताथे यांच्या घरामध्ये हे पिल्लं(baby cobra)  आढळून आली असून यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.

https://thepointnow.in/shocking-information-came-from-the-terrorists/

गजानन ताथे यांना आपल्या रो हाऊस मध्ये सर्पसदृश्य हालचाल आढळून आल्याने त्यांनी तात्काळ सर्पमित्र तुषार गोसावी यांना पाचारण केले. यावेळी गोसावी यांनी तात्काळ घटनास्थळ गाठ संपूर्ण घराची पाहणी केली. यावेळी घरातील एका चेंबरच्या डक मध्ये त्यांना नागाची मादी आढळून आल्याने त्यांनी तिला पकडण्याचा प्रयत्न केला असतांना हि मादी जवळील एका बिळामध्ये शिरली.(nashik)

दरम्यान काही वेळानंतर स्वच्छतागृहाच्या जाळीच्या मार्गातून काही पिल्ले घरामध्ये शिरल्यानं यातील तीन पिल्ले ही ताथे यांच्या घरातील स्वयंपाकगृहामध्ये आढळून आली तर दोन पिल्लं ही बेडरूम मधून गोसावी यांनी ताब्यात घेतली आहेत.

दरम्यान या पिल्लांना तुषार गोसावी यांनी ताब्यात घेतल्यानंतर लागलीच नैसर्गिक(natural place) अधिवासामध्ये नेऊन सोडले आहे. दरम्यान कोब्रा जातीच्या सापाची पाच पिल्लं या ठिकाणी आढळून(snake rescue) आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती. मात्र या पिल्लांना नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आल्यानंतर सर्वांनीच सुटकेचा निष्वास घेतला आहे.

 

आपल्या घरात किंवा परिसरात साप आढळून आल्यास काय करावे? 

•  आपल्या साप घरात , अंगणात किंवा आजूबाजूच्या परिसरात आढळल्यास घाबरुन जाऊ नका, शांत राहण्याचा प्रयत्न करा. सापाला न मारता वनविभाग किंवा आपल्या माहितीतील जाणकार सर्पमित्राला पाचारण करा

• सर्पमित्र येईपर्यंत सुरक्षीत अंतरावरुन सापावर व्यवस्थित लक्ष ठेवा, लहान बालके, पाळीव प्राणी यांना संबंधित जागेपासून दूर घेऊन जा.

• सापाच्या जवळ जाण्याचा, त्याचा फोटो काढण्याचा, सेल्फी काढण्याचा किंवा त्याला बंदिस्त करण्यासाठी त्याच्यावर टोपली, बादली किंवा कपडा टाकून त्याला झाकण्याचा किंवा त्याला त्रास देण्याचा प्रयत्न करु नका. यामुळे तुमच्या जीवितास धोका होऊ शकतो.

• नाग, मण्यार, घोणस, फुरसे हे मानवी वस्तीजवळ आढळणारे प्रमुख चार विषारी साप आहेत. यांचा दंश देखील प्राणघातक असतो अश्या सापापासून सावध राहावे. त्यांची पूर्ण माहीती असावी

• सापांबद्दल पूर्ण ओळख आणि माहिती नसतांना कोणताही साप पकडण्याचा प्रयत्न करू नका.

• गर्दी करू नका, आरडाओरड करून सापाला डीवचण्याचा प्रयत्न करू नका.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here