Shivswarajya Yatra | काल ८ ऑगस्टला नाशिकच्या दिंडोरी विधानसभा मतदारसंघातून अजित पवारांच्या जनसन्मान यात्रेला सुरुवात झाली. यानंतर लगेचच आज शरद पवार गटाच्या शिवस्वराज्य यात्रेला शिजन्मभूमीपासून सुरुवात झाली. शिवनेरी किल्ल्याच्या पहिली पायरीला अभिवादन करून आज शरद पवार गटाच्या शिवस्वराज्य यात्रेला सुरूवात झाली. मात्र, या यात्रेच्या पहिल्याच दिवशी एक मोठी दुर्घटना झाली, असून यात खासदार अमोल कोल्हे किरकोळ जखमी झाल्याची माहिती आहे.
शिवस्वराज्य यात्रेच्या सुरुवातीला किल्ले शिवनेरीच्या पायथ्याशी असलेल्या जुन्नर शहरामधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करताना हा थरारक प्रकार घडला. क्रेनच्या ट्रॉलीमधून पुतळ्याला हार घालण्यासाठी जयंत पाटील, डॉ. अमोल कोल्हे, रोहिणी खडसे आणि मेहबूब शेख हे गेले होते.(Shivswarajya Yatra)
यावेळी हार घालून क्रेन खाली येत असताना हवेतच त्या ट्रॉलीत काही बिघाड झाला. ट्रॉलीचा नट निसटल्याने ट्रॉली एकाबाजूला कलंडली. हवेतच ट्रॉलली तिरकस झाल्याने उपस्थित असलेल्या सर्वांच्याच काळजाचा ठोका चुकला. मात्र, क्रेनचालकाने समयसुचकता दाखवल्याने मोठी दुर्घटना टळली. दरम्यान, या घटनेत इतर सर्व सुखरूप असून, अमोल कोल्हेंना मात्र दुखापत झाल्याची माहिती आहे.
Shiv Swarajya Yatra | अजित पवारांच्या ‘जनसन्मान’ला शरद पवारांच्या ‘शिवस्वराज्य’ने उत्तर..!
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम