Bachhu kadu | अन् संतापलेल्या आमदार बच्चू कडू यांनी थेट अधिकाऱ्याच्या कानशि‍लात लगावली

0
52
Bachhu kadu
Bachhu kadu

Bachhu kadu | आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वच नेत्यांचे विविध ठिकाणी दौरे सुरू असून, यातच आता आमदार बच्चू कडूदेखील आज छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर होते. बच्चू कडू यांनी महायुतीतून बाहेर पडण्याचे संकेत दिले असून, आगामी विधानसभा बच्चू कडू हे महाविकास आघाडीत किंवा स्वबळावर लढण्याची शक्यता आहे.

बच्चू कडू हे आपल्या आक्रमक शैलीसाठी प्रसिद्ध असून, ते दिव्यांग, शेतकरी, कामगारांसाठी आवाज उठवत असतात. त्यांची अनेक आंदोलनं ही गाजली असून, प्रहार स्टाईलने ते प्रश्नांना वाचा फोडत असतात. दरम्यान, आजच्या या संभाजीनगर दौऱ्यादरम्यान संतापलेल्या आमदार बच्चू कडू यांनी जाब विचारत एका अधिकाऱ्याच्या थेट कानशिलात लगावली आहे.

Bachhu kadu : आमदार बच्चूंंनी अखेर घेतला “कडू” निर्णय

Bachhu kadu | नेमकं प्रकरण काय..?

छत्रपती संभाजीनगर येथे अंध-अपंग बांधव बच्चू कडू यांच्याकडे आपल्या समस्या घेऊन आले होते. येथील अपंग बांधवांना सरकारच्या समाज कल्याण विभागाकडून उदरनिर्वाहासाठी ई-रिक्षा देण्यात आल्या होत्या. मात्र, या ई-रिक्षा वाटप झाल्या त्या दिवशीच बंद पडल्या. त्यात काही तांत्रिक बिघाड झाला. याबाबत तक्रारी घेऊन अपंग बांधव आमदार कडू यांच्याकडे आले असता. त्यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्याला जाब विचारला आणि यावेळी संतापलेल्या अधिकाऱ्याला आमदार बच्चू कडू (Bachhu kadu) यांनी थेट कानशिलात लगावली.

Chandwad | आ. बच्चू कडू यांच्या वाढदिवसाच्या निमित्त चांदवडमध्ये रक्तदानाचा रेकॉर्डब्रेक प्रहार

यापूर्वीही बच्चू कडू यांच्या अनेक घटना सोशल मीडियावर व्हायरल

अपंग बांधवांना समाज कल्याण विभागाकडून ई-रिक्षा देण्यात आल्या होत्या. (Rikshaw) त्या रीक्षांमध्ये एका दिवसांतच  बिघाड झाल्याने याबाबत तक्रारी घेऊन काही अपंग बांधव हे बच्चू कडू यांच्याकडे आले होते. यावेळी त्यांनी प्रहार स्टाईलमध्ये अधिकाऱ्याची चांगलीच कानउघडणी केली. यापूर्वीही अधिकाऱ्याच्या कानशि‍लात लगावल्याच्या आणि लॅपटॉफ फेकून मारण्याच्या अनेक घटना बच्चू कडू यांच्या सोशल मीडियावर व्हायरल झाल्या होत्या. याचीच पुन्हा एकदा छत्रपती सांभाजीनगरमध्ये पुनरावृत्ती झाली. (Bachhu kadu)

Bacchu Kadu | बच्चू कडू विधानसभेपूर्वी मविआत जाणार..?; काँग्रेसच्या बड्या नेत्याने घेतली जबाबदारी


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here