Shiv Swarajya Yatra | अजित पवारांच्या ‘जनसन्मान’ला शरद पवारांच्या ‘शिवस्वराज्य’ने उत्तर..!

0
42
Shiv Swarajya Yatra
Shiv Swarajya Yatra

पुणे :  आगामी विधानसभा निवडणूकीच्या (maharashtra assembly election) पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वच पक्षांनी कंबर कसली असून, अजित पवार(ajit pawar) , प्रकाश आंबेडकर, राज ठाकरे (raj thackeray) यांच्यासह अनेक नेते सध्या राज्याच्या दौरे करत आहेत. काल ८ ऑगस्ट रोजी अजित पवारांनी मोठा गाजावाजा करत आपल्या जनसन्मान यात्रेला सुरुवात केली. जनसन्मान यात्रेची सुरुवात ही नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी विधानसभा मतदार संघातून झाली. यासाठी गुलाबी रंगाची बस, गुलाबी रंगाचा ताफा असा मोठा घाट घालण्यात आला असून, पुढील चार दिवस अजित पवार हे नाशकात मुक्कामी असून, ते एका दिवसात दोन मतदार संघांमध्ये करीकर्म घेणार आहेत. (Shiv Swarajya Yatra)

राज्यात शिवसेना विरुद्ध शिवसेना, राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी, आणि भाजप विरुद्ध कॉंग्रेस अशी लढत सुरू असताना, अजित पवार गटाने जनसन्मान यात्री सुरूर केली असताना आता शरद पवार गटानेही आपली शिवस्वराज्य यात्रा सुरू केली आहे. विधानसभा निवडणूकीचे कधीही वाजू शकतात, या पार्श्वभूमीवर आता राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. (Jansanman Yatra)

Jansanman Yatra | गुलाबी जॅकेट घालून, गुलाबी बसमध्ये बसून ‘दादा’ महाराष्ट्र पिंजून काढणार

 शिवनेरीच्या पहिल्या पायरीला अभिवादन करून यात्रेचा शुभारंभ

दरम्यान, शरद पवार(sharad pawar) गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी निष्ठवंतांच्या मेळाव्याच्या माध्यमातून राज्य दौरा करत असताना अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनीही पाठोपाठ राज्य दौराय आखला. आता अजित पवार गटाने जनसन्मान यात्रा सुरू केली असता, पाठोपाठ शरद पवार गटानेही 9 ऑगस्टपासून आपल्या शिवस्वराज्य यात्रेची तुतारी वाजवली आहे. आज शिवजन्मभूमी किल्ले शिवनेरीच्या पहिल्या पायरीला अभिवादन करून या यात्रेचा शुभारंभ होत आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, शिरूरचे खासदार अमोल कोल्हे, आमदार रोहित पवार, रोहिणी खडसे या यात्रेसाठी उपस्थित आहेत. (maharashtra vidhansabha election)

Ajit Pawar In Nashik | नाशकात दादांचा मोठा डाव; शरद पवारांचा निष्ठावंत अजित पवारांच्या गळाला..?

Shiv Swarajya Yatra | कशी असेल यात्रा..?

आज सकाळी 11 वाजता जुन्नरमधील लेण्याद्री येथे यात्रेची पहिली सभा होईल. त्यानंतर आंबेगाव, खेड-आळंदी व शेवटची सभा ही भोसरी विधानसभा मतदार संघात होणार आहे. पुढील दहा दिवस ही यात्रा पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील मतदारसंघांमध्ये पोहोचणार असून, यात्रेच्या शुभारंभासाठी शरद पवार गटाचे नेते सकाळी 9 वाजताच शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याशी एकत्र आले आहेत.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here