Shivsena | आज राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. कारण, आज दुपारी ४ वाजता म्हणजेच अवघ्या काही क्षणांत शिवसेना आमदार अपात्रतेचा ऐतिहासिक निर्णय लागणार आहे. या निर्णयाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेले आहे. ह्या निर्णयाचा गाजावाजा केला जात आहे. सकाळपासूनच आरोप प्रत्यारोपांचे राजकारण सुरू झालेले आहे. या निकालाच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण निर्मिती झाली असून, एबीपी माझाच्या वृत्तानुसार, या निर्णयाचा चेंडू विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे सुप्रीम कोर्टात फेकण्याची शक्यता आहे. दरम्यान, यासोबतच आजच्या निकालात पक्ष म्हणून शिंदे गटाला मान्यता मिळण्याचीही शक्यता आहे. (Shivsena)
आजचा निकाल राहुल नार्वेकर हे कुणाच्याही बाजूने किंवा विरोधात देणार नाहीयेत, यामुळे आता कोणाचेही आमदार अपात्र ठरणार नाहीत. तसेच, याप्रकरणी दोन्ही गटांनी सर्वोच्च न्यायालयात जावे असा निर्णय दिला जणार असल्याची शक्यता आहे.
Shivsena | शिंदे अपात्र ठरल्यास; ‘हे’ होणार राज्याचे नवे मुख्यमंत्री?
Shivsena | शिंदे गटाला पक्ष म्हणून मान्यता?
एबीपी माझाच्या वृत्तानुसार, आता शिवसेनेच्या शिंदे आणि ठाकरे या दोन्ही गटाच्या कोणत्याही आमदारांना अपात्र ठरवले जाणार नाही. आणि या निर्णयावर जर काही आक्षेप असेल तर त्यांनी सर्वोच्च न्यायालयात जावे. तसेच यावेळी शिवसेना एकनाथ शिंदे गटाला अधिकृतपणे शिवसेना पक्ष म्हणून मान्यही दिली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. या शिवसेना आमदार अपात्र निकालाच्या वाचनाला राहुल नार्वेकर हे आज साडे चार वाजता सुरुवात करतील. तर, या निकालाचे लाईव्ह प्रक्षेपण देखील केले जाणार आहे.(Shivsena)
शिवसेना वैद्यकीय कक्षा तर्फे मोफत 2D इको तपासणी शिबिर; लाभ घेण्याचे पालकमंत्र्यांचे आवाहन
ठाकरे गटाला निर्णय आधीच माहीत..?
हा संभाव्य निकाल उद्धव ठाकरे गटाला आधीच माहीत होता का? ज्यामुळे त्यांनी आधीच सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. असाही प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे. दरम्यान, शिवसेनेच्या या दोन्ही गटांनी एकमेकांच्या विरोधात तक्रारी केल्या असून, ठाकरे गटाने शिंदेंच्या १६ आमदारांच्या विरुद्ध तर, शिंदे गटाने ठाकरेंच्या १४ आमदारांच्या विरुद्ध आमदार आपत्रतेची याचिका दाखल केली आहे. दोन्हीही नेत्यांना किंवा त्यांच्या शिलेदारांना न दुखवता विधानसभा अध्यक्ष हे या निकलाचा सुवर्ण मध्ये साधणार असल्याचे यामुळे दिसत आहे.(Shivsena)
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम