Shivsena | शिंदे अपात्र ठरल्यास; ‘हे’ होणार राज्याचे नवे मुख्यमंत्री?

0
3
Shivsena
Shivsena

Shivsena |  राज्यासह संपूर्ण देशाचे लक्ष असलेल्या शिवसेना (Shivsena) आमदार अपात्रता प्रकरणी आज दुपारी ४ वाजता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे निकाल जाहीर करणार आहे. यावरून आता राज्यात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांचे नवे सत्र सुरू झाले आहे. दरम्यान, आज हा निकाल लागणार का? लागला तर निकाल कोणाच्या बाजूने लागणार?, शिंदे सरकार अपात्र ठरणार की ठाकरेंचे आमदार अपात्र ठरणार?, राज्याच्या सत्तेची भाकरी फिरणार?, आणि जर शिंदेंचे आमदार अपात्र ठरले तर, प्लॅन ‘बी’ काय? हे प्रश्न आता सर्वांनाच पडले आहेत.

मात्र, शिंदे-फडणवीस- पवार सरकार हे अबाधित राहील आणि मुख्यमंत्री शिंदेच राहतील. तसेच आजचा विधानसभा अध्यक्षांचा निकाल हा आमच्या बाजूनेच येईल. असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. उपमुख्यमंत्र्यांची ही विधाने लक्षात घेता, हा निकाल जर शिंदेंच्या विरोधात लागला तर, भाजपकडून ‘प्लॅन बी’ सुरू असल्याची चिन्हे आहेत. (Shivsena)

Shivsena MLA Disqualification | आज हे आमदार अपात्र ठरणार..?; यादीत कोणाकोणाचा समावेश

 Shivsena | विरोधात निकाल लागल्यास..?

आज बहूप्रतीक्षित शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी निकाल लागणार असून,आज दुपारी ४ वाजता हा निकाल राहुल नार्वेकर जाहीर करणार आहेत. निकालाचं ‘काउंटडाउन’ हे आता सुरू झाले आहे. तसेच, या निकालाचे लाईव्ह प्रक्षेपण होणार आहे. याबाबत राहुल नार्वेकर यांनी सूचना केल्या आहेत.

दरम्यान, या प्रकरणी कायदेतज्ज्ञांच्या सांगण्याप्रमणे जर, यावेळी शिंदे गट अपात्र ठरला आणि शिंदेंना राजीनामा द्यावा लागला. तर, तातडीने त्यांच्या गटातील मंत्री तसेच आमदारांनाही राजीनामा द्यावा लागणार आहे आणि असे झाल्यास सरकार पडेल. असे झाल्यास राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण होणार?.

तर, काही दिवसांपूर्वी महायुतीमध्ये सामील झालेल्या राष्ट्रवादीच्या अजित पवारांचा गटाने त्यांच्या सोबत ४० आमदार असल्याचा दावा केला आहे. विधानसभेत एकूण तब्बल २८८ जागा असून, बहुमत सिद्ध करण्याससाठी किमान १४५ आमदारांचा पाठिंबा असणे गरजेचे असते. दरम्यान, त्यापैकी भाजपकडे १०५ जागा आहेत. त्यात राष्ट्रवादी अजित पवार गट, तसेच सरकारमध्ये सामील असलेले काही लहान घटक पक्ष व अपक्ष आमदार यांची एकूण बेरीज केल्यास बहुमत सिद्ध होऊ शकते. (Shivsena)

Shivsena News | सुषमा अंधारे आज आमदार कांदेंच्या बालेकिल्ल्यात गरजणार

अजित दादांच्या स्वप्नांची पूर्तता होणार?

त्यामुळे जारी, एकनाथ शिंदे आणि त्यांचे १६ आमदार अपात्र ठरले तरी, राज्यात पुन्हा एकदा महायुतीचंच सरकार येईल. मात्र, मुख्यमंत्री नवे असतील. असे घडल्यास अजित पवार गटाकडे सत्तेची कमाण जाऊ शकते. भाजप अजित पवारांना राज्याचे मुख्यमंत्री करू शकते. दरम्यान, सविस्तर बघितल्यास राज्याच्या विद्यमान सरकारकडे अवघा काही महिन्यांचाच अवधी उरला आहे. त्यामुळे आता अजित पवारांच्या हाती मुख्यमंत्रिपदाची दोर सोपवली जाऊ शकते. मात्र, असे झाल्यास अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेले अजित दादांचे मुख्यमंत्री पडी विराजमान होण्याचे स्वप्न पूर्ण होईल. मात्र, आता अजित दादांची स्वप्नपूर्ती होणार की, त्यांना याहीवेळी उपमुख्यमंत्री पदावरच समाधान मानावे लागेल, हे भावे लागणार आहे. (Shivsena)


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here