Skip to content

Ayodhya | शिंदे सरकारने घेतले हे ‘आठ’ मोठे निर्णय

Ayodhya

Ayodhya |  संपूर्ण देशासह जगाचे ज्याकडे लक्ष होते. त्या अयोध्येतील राम मंदिराचा लोकार्पण सोहळा तसेच प्रभू श्री रामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा सोहळा हा येत्या २२ जानेवारी रोजी पार पडणार आहे. दरम्यान, या दिवशी देशाच्या जनतेने दिवाळी साजरी करावी असे आवाहन देशातील जनतेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.

तर, या दिमाखदार सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने अगदी दिवाळीप्रमाणेच राज्यामधील दीड कोटी शिधापत्रिका धारक नागरिकांना ‘आनंदाचा शिधा’ वाटण्याचा निर्णय राज्याच्या कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. दरम्यान, यानुसार या दीड कोटी शिधापत्रिकाधारकांना केवळ १०० रुपयात १ किलो रवा, १ किलो चणा डाळ, १ किलो साखर व १ लिटर पामतेल हे दिले जाणार आहे. यासोबतच राज्य मंत्रिमंडळाच्या या बैठकीत आणखीही काही महत्त्वपूर्ण निर्णय हे घेण्यात आलेले आहेत.(Ayodhya)

CM Eknath Shinde Ayodhya Visit : मुख्यमंत्र्यांच्या अयोध्या दौऱ्याची जबाबदारी नाशिक शिवसेनेवर,

तसेच आता २२ जानेवारी रोजी अयोध्येतील राम मंदिराच्या लोकार्पणाच्या निमित्ताने व १९ फेब्रुवारीला शिवजयंतीच्या दिवशी हा ‘आनंदाचा शिधा’चं नागरिकांना दिला जाणार आहे. तर, याआधी हा शिधा फक्त दिवाळी, दसरा, बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त दिला जात होता. मात्र, आता यात आणखी दोन दिवसांचा समावेश केल्याचे राज्य सरकारने जाहीर केले आहे.

Ayodhya | असे आहेत मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय 

१. नागरी भागात ‘नागरी बाल विकास केंद्र’ हे अतितीव्र कुपोषित बालकांसाठी सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

२. ग्रामविकास विभागांच्या योजनांच्या जाहिरात तसेच प्रसिद्धीसाठी नवे लेखाशिर्ष उघडण्यास मान्यता देण्यात आलेली आहे.

३. शासकिय लेख्यातून (मकोनी नमुना क्रमांक 44 द्वारे) आहरित केलेल्या सहायक अनुदानाच्या जलद संवितरण आणि संनियंत्रणासाठी आहरण तसेच संवितरण अधिकारी व अन्य अशासकीय कार्यान्वयन प्राधिकारी यांच्यासाठी आभासी वैयक्तिक ठेव लेखा ही कार्यपद्धती लागू करण्यास मंजुरी देण्यात आली आहे.

४. ‘सत्यशोधक’ या चित्रपटाला राज्य वस्तू व सेवा कर या कायद्यांतर्गत आकारल्या जाणाऱ्या राज्य वस्तू व सेवा कराच्या प्रतिपूर्तीस मंजुरी दिली आहे.

Indian Rupees: भारतीय रुपयाचे वाढते वर्चस्व! आता या देशासोबत भारतीय चलनात होणार व्यवसाय, जाणून घ्या

५. ‘जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र’ हे विरार या कार्यालयातील कर्मचाऱ्यांना ‘भविष्य निर्वाह निधी’ योजना आणि  सेवानिवृत्ती वेतन ही योजना लागू करण्यात आली आहे.

६. ‘पं. दीनदयाळ उपाध्याय घरकुल’ या जागेच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य योजनेच्या अंतर्गत घरकुलाच्या बांधकामासाठी भूमिहीन पात्र असलेल्यांना जागा खरेदीसाठी दिले जाणारे अनुदान .५० हजारांवरून आता एक लाखांपर्यंत केले जाणार आहे.

७. राज्यातील प्रकल्पबाधित नागरिकांचे पुनर्वसन अधिनियम, १९९९ लागू असलेल्या पाटबंधारे प्रकल्पाच्या बाधित परिमंडळामधील गावठाणातून स्थलांतर न झालेल्या गावठाणामधील प्रकल्पग्रस्तांना नवीन पुनर्वसित गावठाणाऐवजी रोख रक्कम स्वरुपात आर्थिक पॅकेज दिले जाणार आहे.

८. राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेच्या अंतर्गत सर्व पात्र शिधापत्रिका धारकांना अयोध्येतील ‘श्रीराम प्राणप्रतिष्ठा’ या सोहळ्याच्या नमित्ताने तसेच छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त ‘आनंदाचा शिधा’ दिला जाणार आहे. (Ayodhya)


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!