Shivsena MLA Disqualification | आज हे आमदार अपात्र ठरणार..?; यादीत कोणाकोणाचा समावेश

0
4
Shivsena MLA Disqualification
Shivsena MLA Disqualification

Shivsena MLA Disqualification |  आज राज्याच्याच नाहीतर, संपूर्ण देशाच्या राजकारणातील ऐतिहासिक आणि राजकीय दृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा निर्णय होणार आहे. शिवसेनेत फुट पडल्यानंतर शिवसेनेचे ठाकरे आणि शिंदे हे दोन गट पडले. काही आमदार शिंदेंच्या सेनेत गेले तर, काही ठाकरेंचे निष्ठावंत राहिले.

दरम्यान, आज अनेक दिवसांपासून प्रलंबित आणि बहूप्रतिक्षित असलेला शिवसेनाचा आमदार आपत्रतेचा निर्णय औत्सुक्यपूर्ण निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे आज दुपारी ४ वाजता जाहीर करणार आहेत. दरम्यान, जर हा निकाल राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात लागला तर, शिंदेंचे कोणते शिलेदार अपात्र ठरतील आणि जर हा निर्णय खरंच शिंदेंच्या विरुद्ध असेल तर, आता राज्याच्या राजकारणात पुढे काय होणार?, सत्ता पालटणार?, शिंदेंचे १६ आमदार अपात्र ठरणार की ठाकरेंचे १४ आमदार अपात्र ठरणार ? हे सर्व प्रश्न सध्या राज्याच्या जनतेला पडले आहेत. (Shivsena MLA Disqualification)

MLA Disqualification | १० जानेवारीला ठरणार महाराष्ट्राच्या राजकारणाचं भविष्य?

Shivsena MLA Disqualification | आमदार आपात्रता प्रकरणी ‘मॅच फिक्सिंग’..?

मात्र, यात आणखी एक ट्विस्ट म्हणजे काल रात्री विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात बंद दाराआड चर्चा झाली. त्यानंतर ठाकरे गटाने निकाल देण्याआधीच सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. दरम्यान, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी विधानसभा अध्यक्षांवर ‘मॅच फिक्सिंग’ चे आरोप केले आहेत. हा निर्णय आधीच दिल्लीतून आलेला आहे. आता फक्त हा निर्णय जाहीर करण्याची औपचारिकता आता उरली आहे. अशी टीका राऊत यांनी केली आहे. (Shivsena MLA Disqualification)

मात्र, हा निकल दोघांपैकी कोणच्याही बाजूने लागल्यास शिंदे आणि ठाकरेंचे कोणते आमदार अपात्र ठरू शकतात. त्या संभवय आमदारांची यादि पुढीलप्रमाणे….

MLA Disqualification | एकनाथ शिंदेंना हटवण्यासाठी विश्वासुंनीच केल्या होत्या सह्या..?

बाळसाहेबांची शिवसेना (एकनाथ शिंदे गट)

  • १. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
  • २ . मंत्री अब्दुल सत्तार
  • ३. संदीपान भुमरे
  • ४. संजय शिरसाट
  • ५. मंत्री तानाजी सावंत
  • ६. यामिनी जाधव
  • ७. चिमणराव पाटील
  • ८. भरत गोगावले
  • ९. लता सोनवणे
  • १०. प्रकाश सुर्वे
  • ११. बालाजी किणीकर
  • १२. अनिल बाबर
  • १३. महेश शिंदे
  • १४. संजय रायमूलकर
  • १५. रमेश बोरणारे
  • १६. बालाजी कल्याणकर(Shivsena MLA Disqualification)

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट

  • १. सुनिल प्रभू
  • २. अजय चौधरी
  • ३. सुनील राऊत
  • ४. रवींद्र वायकर
  • ५. राजन साळवी
  • ६. वैभव नाईक
  • ७. नितीन देशमुख
  • ८. भास्कर जाधव
  • ९. राहुल पाटील
  • १०. रमेश कोरगावकर
  • ११. प्रकाश फातर्पेकर
  • १२. उदयसिंह राजपूत
  • १३. संजय पोतनीस
  • १४. कैलास पाटील(Shivsena MLA Disqualification)

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here