Skip to content

MLA Disqualification | १० जानेवारीला ठरणार महाराष्ट्राच्या राजकारणाचं भविष्य?

Shivsena Result

MLA Disqualification | महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या अनेक ट्विस्ट येत असून आता राज्याचे मुख्यमंत्री यांच्यासह 16 आममदारांच्या अपात्रेचा निकाल तयार झालेला आहे. 10 जानेवारी 2024 रोजी 4 वाजता आमदार अपात्रतेचा निकाल जाहीर केला जाणार आहे.

आमदार अपात्रतेच्या या निकालावर दिल्लीतील तज्ज्ञांकडून अभिप्राय मागवण्यात आले असून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर त्यांच्या निकालपत्राचा मसुदा कायदेशीर अभिप्रायासाठी दिल्लीतील कायदेतज्ज्ञांकडे पाठविल गेला आहे. दरम्यान, काही दिवसांपुर्वी निवडणूक आयोगाने शिनसेने पक्षाच्या वादात शिंदे गटाच्या बाजूले कौल दिलेला होता.

PM Narendra Modi | मोदींचे नाशकात ‘शक्तिप्रदर्शन’; नेमकं पडद्यामागे चाललंय काय..?

MLA Disqualification | आमदार अपात्र ठरणार याचा निकाल येत्या दोन दिवसांत

शिवसेना पक्ष हा राज्यातील राजकारणाचा महत्त्वाचा घटक असून शिवसेना पक्षात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांचे 40 आमदार अपात्र ठरणार की उद्धव ठाकरे यांच्या गटातील 14 आमदार अपात्र ठरणार याचा निकाल येत्या दोन दिवसांत म्हणजेच 10 जानेवारी 2024 रोजी लागणार आहे. विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे एकूण 34 याचिका दाखल करण्यात आल्या होत्या आणि यावर 14 सप्टेंबर ते 20 डिसेंबर या कालावधीत सुनावणी सुरू होती. त्या आधी निवडणूक आयोगाने शिवसेनेतील फुटीत पक्षाचे नाव आणि चिन्ह हे शिंदे गटाकडे सुपूर्द करून एकनाथ शिंदे यांचीच शिवसेना अधिकृत असल्याचे कौल दिलेला होता.

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बंड करत भाजपासोबत सत्ता स्थापन केली. तेव्हापासून एकनाथ शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गटाचे पक्षावरून वाद सुरू होते. दरम्यान, शिंदे गटाने शिवसेनेत फूट पडलेलीच नाही, असा युक्तिवाद करून शिवसेनेत आम्ही नेतृत्व बदल केल्याचा दावा करण्यात आली आहे. शिवसेनेच्या दोन्ही गटांची एकमेकांच्या विरोधात पक्षांतर बंदी कायद्यानुसार पक्षाच्या शिस्तीचा भंग केल्याची कारवाई करा अशी मागणी करण्यात आली असून तसे झाले तर आमदाराची विधिमंडळ सदस्यत्वता धोक्यात येऊ शकते.

Devmamledar | अन् एक सरकारी अधिकारी झाले बागलाणकरांचे ‘देव मामलेदार’

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह १६ आममदारांच्या अपात्रेचा निकाल तयार झाला असून 10 जानेवारीला 4 वाजता हा निकाल जाहीर होणार आहे. येणारा निकाल राज्याच्याच नव्हे तर देशाच्या इतिहासांत महत्त्वाचा ठरणार असून त्यामुळे आता प्रश्न असा निर्माण झाला आहे की नेमका हा कौल कुणाच्या बाजूने लागणार? तसेच या निकालावर महाराष्ट्राच्या राजकारणाचे भविष्य देखील ठरणार असल्याचे म्हटले जात आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!