Devmamledar | अन् एक सरकारी अधिकारी झाले बागलाणकरांचे ‘देव मामलेदार’

0
1
Devmamledar
Devmamledar

तनुजा शिंदे : Devmamledar |  नाशिक जिल्ह्याचे श्रद्धास्थान असलेले देशातील एकमेव अधिकाऱ्याचे मंदिर म्हणजेच नाशिक जिल्ह्यातील बागलाण येथील यशवंतराव महाराज म्हणजेच देवमामलेदार यांचे मंदिर. सध्या सटाणा येथे देवमामलेदार मंदिरात १५ दिवस यात्रोत्सव सुरू असून, येथे रोज भक्तांचा मोठा समुदाय दर्शनासाठी येत आहे. यानिमित्ताने आज जाणून घेऊयात, का एका अधिकाऱ्याला लोकांनी देवत्व बहाल केले.(Devmamledar)

देवमामलेदारांचा जन्म 

यशवंत महाराज यांचा जन्म हा एका १३ सप्टेंबर १८१५ रोजी एका दत्तभक्त कुटुंबात आणि पुणे येथील ओंकार वाड्यात झाला. यशवंतराव महाराज हे स्वतः स्वामी समर्थांची सेवा करत. ते लहानपणापासूनच गोरगरीब, आणि निराधारांची मदत करत. गोरगरिबांच्या कल्याणासाठी त्यांनी त्यांचे आयुष्य समर्पित केले. त्यांनी इ. स. १८२९ ते १८७२ म्हणजेच तब्बल ४३ वर्षे महसूल खात्यात अनेक पदांवर राज्याच्या अनेक भागांत नोकरी केली. (Devmamledar)

Shani Dev | वर्षातील शेवटच्या शनिवारी शनिदेवांना ‘अशा’ प्रकारे करा प्रसन्न

Devmamledar | बागलाणकरांचे ‘देव मामलेदार’

महाराष्ट्र राज्यात इ. स. १८७०-१८७१ या काळात फार मोठा आणि भयावह दुष्काळ पडला होता. मुके प्राणीच नाहीतर माणसंही तेव्हा भुकेने मृत्युमुखी पडत होती. आणि त्याच काळात यशवंतराव महाराज हे बागलाण प्रांताचे तहसीलदार होते. त्यावेळी लोकांची अवस्था पाहून त्यांनी आपली सर्व मालमत्ता विकली आणि सर्व रक्कम ही त्या दुष्काळग्रस्त लोकांमध्ये वाटली. मात्र, दुष्काळाचे ते रूप इतके विदारक होते. की, त्यासमोर ही रक्कम फारच कमी होती. आणि हेच जाणवल्यानंतर त्यांनी सरकारी तिजोरीतीलही सर्व रोख रक्कम ही लोकांमध्ये वाटून दिली. (Devmamledar)

Champa shashthi | आज ‘चंपाषष्ठी’च्या दिवशी असा करा देवाचा कुलधर्म

दरम्यान, हि रक्कम काय थोडी नव्हती, ती १,२७,००० इतकी त्याकाळी होती. मात्र, हि बाब वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळाली आणि ते तिजोरी तपासण्यासाठी आले असता, तिथे एक चमत्कार घडला. त्यावेळी सर्व रक्कम ही तिजोरीत तशीच होती. त्यात एक रुपयाही कमी भरला नाही आणि यानंतर भगवान महाविष्णूनी यशवंत महाराजांना दर्शन दिले. याचमुळे मरण यातना भोगत असताना आपल्या मदतीला देवासारखे धावून येणाऱ्या तहसीलदाराला बागलाण आणि कसमादे भागातील लोकांनी देवत्व बहाल केले आणि तेव्हापासून तहसीलदार यशवंतराव महाराज हे बागलाणकरांचे ‘देव मामलेदार’ झाले. (Devmamledar)

देवमामलेदारांनी त्यांच्या येथील कार्यकाळात अनेक साक्षात्कार केले आणि लाखो लोकांचे ते कैवारी झाले. देव मामलेदार महाराजांनी त्यांचा जडदेह २७-१२-१८८७ रोजी सटाणा येथे पंचत्वात विलीन केला. नाशिकमधील साटणा येथेच त्यांची समाधी आहे. दरम्यान, येथे दरवर्षी त्यांचा पुण्यतिथी उत्सव साजरा केला जातो. हा फार दिमाखदार सोहळा असतो. हा सोहळा तब्बल १५ दिवस असतो. सटाणा येथे देव मामलेदारांचे निवासस्थान होते. त्यामुळे येथे त्यांचे एक सुंदर मंदिर उभारण्यात आले आहे. (Devmamledar)


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here