Sharad Pawar NCP | शरद पवार ॲक्शन मोडवर; ऑनलाइन बैठकीत उमेदवारांना महत्त्वाच्या सूचना

0
38
#image_title

Sharad Pawar NCP | राज्यामध्ये मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आता निकालाची प्रतीक्षा लागून राहिली आहे. तर उद्या विधानसभा निवडणूक 2024 चा निकाल जाहीर होणार असून त्यापूर्वीच राजकीय घडामोडींना वेग आला आहे. निकालाचा काउंटडाऊन सुरू झाला असून उमेदवारांची धाकधूक वाढली  आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी उमेदवारांना महत्त्वाच्या सूचना केल्याची माहीती समोर आली आहे.

Sharad Pawar NCP | राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची दुसरी यादी जाहीर; दिंडोरीत झिरवाळांना ‘हा’ नेता टक्कर देणार

शरद पवार गटाची ऑनलाईन बैठक

विधानसभा निवडणुकीच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर शरद पवार गटाचे उमेदवारांची ऑनलाईन बैठक पार पडली असून या बैठकीमध्ये शरद पवार, सुप्रिया सुळे, जयंत पाटील या वरिष्ठ नेत्यांकडून उमेदवारांना मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी उमेदवारांना निकालाच्या पार्श्वभूमीवर काही महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे. यावेळी शरद पवारांकडून महाविकास आघाडीला 157 जागा मिळतील असा विश्वास व्यक्त करण्यात आला असून उमेदवारांनी निकालानंतर प्रमाणपत्र घेऊन थेट मुंबई गाठा अशी सूचना करण्यात आली आहे.

Sharad Pawar NCP | थोरल्या पवारांनी भाजपची विकेट पाडली; माजी राज्यमंत्री शरद पवारांच्या गळाला

महायुतीत हालचाली वाढल्या

दरम्यान, महायुती देखील ॲक्शन मोडवर आली असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या विश्वासू नेत्यावर अपक्ष उमेदवारांची मनधरणी करण्याची जबाबदारी दिली असून महायुती कोणत्याही पद्धतीने सरकार बनवण्याच्या तयारीत दिसत आहे. त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करण्यासाठी भाजप नेते प्रयत्नशील आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी पालघर, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र व विदर्भातील आपल्या जवळच्या नेत्यांना सक्रिय केल्याची माहिती आहे. त्यांच्यावर भाजपला पाठिंबा देण्यासाठी अपक्ष उमेदवारांना आपल्या बाजूने वळवण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here