Political News | निकलापूर्वीच दोन्ही गटांचा ‘प्लॅन बी’ रेडी; आमदारांना परराज्यात नेण्यासाठी हॉटेल, विमानं सज्ज

0
48
#image_title

Political News | विधानसभा निवडणूक 2024 साठी मतदान पार पडले आहे. निवडणुकानंतर आता निकालाची प्रतीक्षा असून एक्झिट पोलचे अंदाज यायला सुरुवात झाली आहे. दरम्यान राजकीय घडामोडींना ही वेगाला असून दोन्ही आघाड्यांकडून ‘प्लॅन बी’ची तयारी सुरू झाली आहे. निकालानंतर बहुमत न मिळाल्यास किंवा काठावर बहुमत मिळाल सत्ता स्थापनाकरीता लागणाऱ्या मतांची जुळवाजुळव करण्यासाठी निकालाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे 24 नोव्हेंबरला पक्षाच्या आमदारांना मुंबईत बोलावण्यात आले आहे. त्याचसोबत फक्त पक्षाचे आमदारच नाही तर बंडखोर व निवडून येणाऱ्या अपक्ष आमदारांना देखील चार्टर्ड प्लेनने मुंबईत आणण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. या सर्व आमदारांची पंचतारांकित हॉटेल्स मध्ये राहण्याची व्यवस्था आहे.

Political News | निकालापूर्वीच राजकीय घडामोडींना वेग; मविआ बंडखोरांना परत मिळवण्याच्या प्रयत्नात!

निकालापूर्वी राजाकीय घडामोडींना वेग

भाजपने 2022 मध्ये शिवसेनेचे आमदार फोडत त्यांना राज्याबाहेर म्हणजेच गुवाहाटीला नेले होते. त्यानंतर राज्यात राजकीय उलथापालक झाली आणि सत्ता बदलली. त्यामुळे या निवडणुकीतही उद्या काँग्रेसचे जास्त आमदार निवडून आले तर असा धोका होऊ नये या कारणासाठी काँग्रेसने खबरदारी बाळगत आपली सत्ता असलेल्या राज्यात या आमदारांना विशेष विमानाने नेण्याची तयारी केली आहे. फक्त काँग्रेसच नाहीतर भाजप, शिवसेना, उद्धव ठाकरे गट या पक्षांनी देखील आपापल्या आमदारांना बंडखोरी पासून वाचवण्यासाठी हॉटेलमध्ये खोल्या बुक करून ठेवल्याची माहिती आहे. उद्धव ठाकरे गटाने ग्रँड हयात, भाजपने सॉफिटेल हॉटेल आणि काँग्रेसने रेनिसन्स हॉटेलमध्ये खोल्या बुक केल्याची माहिती आहे. तसेच अपक्ष आमदारांची मनधरणी करण्यासाठी बड्या नेत्यांवर जबाबदारी देण्यात आली आहे.

Political News | मुख्यमंत्रीपदावरून ‘मविआ’तील वाद चव्हाट्यावर; राऊत-पटोले यांच्यातील खडाजंगी सुरूच

अजित पवावारांची राष्ट्रवादी आणि उद्धवसेना निर्णायक भूमिका बजावणार? 

महायुतीकडून अजित पवार आणि महाविकास आघाडी कडून उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्रीपदासाठी इच्छुक असून निवडणुकीत कमी उमेदवार असले तरी सत्तांतरासाठी हे दोन्ही पक्ष महत्त्वाच्या भूमिका बजावण्याची शक्यता आहे. तसेच जर अजित पवारांचे 20 ते 25 या दरम्यान आमदार निवडून आल्यास मुख्यमंत्री पदासाठी अजित पवार मविआसोबत जाऊ शकतात. तर दुसरीकडे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदासाठी मविआची अडवणूक करू शकतात.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here