Shivjayanti | अठरापगड जातींना सोबत घेऊन स्वराज्य स्थापना करणारे छत्रपती शिवाजी महाराज

0
30
Shivjayanti
Shivjayanti

Shivjayanti | आज अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती असून, या निमित्ताने राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी त्यांच्या नाशिक येथील कार्यालयात शिवजन्मोत्सव उत्साहात साजरा केला. यावेळी मंत्री छगन भुजबळ यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन तथा अठरापगड जातींना सोबत घेऊन स्वराज्य स्थापना करणारे छत्रपती शिवाजी महाराज अखंड हिंदुस्थानचे मानबिंदू असल्याचे प्रतिपादन केले. (Shivjayanti)

यावेळी मंत्री छगन भुजबळ व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मुंबई अध्यक्ष समीर भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत भुजबळ फार्म येथील कार्यालयात शिवजन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. कार्यक्रमा प्रसंगी ते बोलत होते. यावेळी दिलीप खैरे, बाळासाहेब कर्डक, नानासाहेब महाले, रंजन ठाकरे, विष्णुपंत म्हैसधूने, निवृत्ती अरिंगळे, मनोहर कोरडे, समाधान जेजुरकर, योगेश निसाळ, संजय खैरनार, प्रेरणा बलकवडे, योगिता आहेर, कविता कर्डक, पूजा आहेर, आशा भंदुरे, किशोरी खैरनार, सुरेखा निमसे, नागेश गवळी, मकरंद सोमवंशी, नितीन चंद्रमोरे, अमोल नाईक, शंकर मोकळ, नाना पवार, सागर मोटकरी, मुख्तार शेख, श्रीराम मंडळ, प्रसाद सोनवणे, पपू शिंदे, श्रीराम मंडळ, भालचंद्र भुजबळ, ऍड.चिन्मय गाढे, रामेश्वर साबळे, संतोष पुंड यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.(Shivjayanti)

Shivjayanti 2024 | शिवजयंती निमित्त मुख्यमंत्र्यांची शिवनेरीवरून घोषणा…

त्यांनी ‘कुळवाडीभूषण’ असा गौरवपूर्ण उल्लेख केला

यावेळी मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, “क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले यांनी १८८० साली रायगडावर जाऊन छत्रपती शिवरायांची समाधी शोधून काढली, त्या ठिकाणी साफसफाई करून मोठ्या आदराने त्या समाधीवर फुले वाहिली. तसेच शिवरायांवर पहिला पोवाडा लिहून शिवाजी महाराजांचा अभिमानास्पद वारसा घराघरात पोहोचवला. पुढे शिवजयंती साजरी करण्याची कल्पना देखील त्यांनीच मांडली आणि त्यासाठी वर्गणी देखील जमविली. महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या रयतेच्या या राजाचा त्यांनी ‘कुळवाडीभूषण’ असा अत्यंत गौरवपूर्ण उल्लेख केला असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.(Shivjayanti)


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here