Trunmul Congress | पक्ष कार्यालयात महिलांवर अत्याचार; आरोपी नेता फरार

0
59
Trunmul Congress
Trunmul Congress

Trunmul Congress |  आगामी लोकसभा निवडणूक ह्या अगदी तोंडावर असताना अशातच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रीय महिला आयोगासमोर त्यांच्या एका नेत्यावर महिलांनी काही गंभीर आरोप केले आहेत. या नेत्याचे कार्यकर्ते गावोगावी जातात आणि सुंदर महिला व मुलींचा शोध घेऊन त्यांची यादी तयार करतात आणि रात्री त्या महिला आणि मुलींचे अपहरण केले जाते.(Trunmul Congress)

Trunmul Congress | पक्ष कार्यालयात अत्याचार 

रात्रभर या अपहरण केलेले मुलींवर बलात्कार आणि अत्याचार केले जातात आणि दुसऱ्या दिवशी त्यांना घराबाहेर हाकलून दिले जाते. अनेकदा पक्षाच्या बैठकींच्या नावाखालीदेखील महिलांना पक्ष कार्यालयात बोलावून, त्यांच्यावर पक्ष कार्यालयातच लैंगिक अत्याचार केले जातात. येथे क्रूरतेच्या सर्व मर्यादा ओलांडल्या जात असून, या अत्याचाराच्या विरोधात जर कुणी तक्रार केली तर संबंधित महिलेच्या पतीला किंवा मुलींच्या वडिलांना खोट्या गुन्ह्यांत अडकवले जाते. तिच्या कुटुंबालाही त्रास दिला जातो. दरम्यान, या आरोपांमुळे देशाच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे.

तर, या महिलांनी राष्ट्रीय महिला आयोगासमोर या घटना सांगितल्या आहेत. या घटनेत विशेष म्हणजे स्वतः महिला मुख्यमंत्री असलेल्या ममता बॅनर्जी यांच्या राज्यात आणि यांच्याच पक्षाच्या नेत्याने हे कृत्य केले आहे. मात्र, सध्या हा नेता पसार झाला असून, या नेता उत्तर परगणामधील तृणमूल कॉंग्रेसचा नेता आहे. याचे नाव शाहजहान शेख असे आहे. पश्चिम बंगालमधील उत्तर २४ परगणा या जिल्ह्यातील ‘संदेशखळी'(sandeshkhali) या गावातून हे प्रकरण समोर आले असून, यामुळे आता दिल्लीचे राजकारणही ढवळून निघाले आहे.(Trunmul Congress)

Loksabha Election | लोकसभा निवडणूक कधी? मुख्य निवडणूक आयुक्तांची माहिती

गावाला सुरक्षा गार्ड दिले; पण… 

संदेशखळी या गावातील (sandeshkhali) महिलांनी नेते शाहजहान शेख यांच्यासह त्यांचे आणखी दोन सहकारी असलेले शिव प्रसाद व उत्तम सरदार यांच्यावरही आरोप केले आहेत. तसेच केवळ महिलांवरील अत्याचाराच्याच नाहीतर, शाहजहान शेख यांच्यावर धमकावत जमीन बळकावल्याचेही आरोप करण्यात आले आहे. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर आता पोलिसांनी या गावाला सुरक्षा गार्ड दिले असून, हे गार्ड हटवताच शहाजहान शेख आणि त्यांचे कार्यकर्ते पुन्हा नागरिकांना आणि महिलांना त्रास देतील, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केलीय आहे. (Trunmul Congress)

पोलिसांची या नेत्याबरोबर मिलीभगत..?

दरम्यान, राष्ट्रीय महिला आयोगाच्या अहवालात “पीडित महिलांच्या तक्रारी या पश्चिम बंगाल पोलीसांकडे येऊनही त कुठलीही कारवाई करत नसून, त्यामुळे पोलिसांची संबंधित टीएमसी नेत्याबरोबर मिलीभगत असल्याचे अहवालात म्हटले आहे. तसेच टीएमसी नेते शाहजहान शेख यांच्या विरुद्ध पीडित महिलांनी पोलीसांकडे तक्रार करण्याचा प्रयत्न केल्यास पोलीस त्यांच्याकडे वैद्यकीय अहवाल मागतात आणि उलट तिच्या पतीला किंवा पित्याला खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकवून तिच्या संपूर्ण कुटुंबालाही त्रास देतात, असेही या राष्ट्रीय महिला आयोगाच्या अहवालात नमूद केले आहे.

Shivjayanti 2024 | शिवजयंती निमित्त मुख्यमंत्र्यांची शिवनेरीवरून घोषणा…

ईडीच्या अधिकाऱ्यांवरही केला होता हल्ला 

तर, दुसरीकडे राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाने पश्चिम बंगाल राज्यात थेट राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली आहे. ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल कॉंग्रेस पक्षाचे हे नेते शाहजहान शेख पसार असून, हेच नाहीतर याआधीही त्याच्याविरुद्ध रेशन घोटाळा केल्याप्रकरणी ईडी तपास सुरू आहे. दरम्यान, शहाजहान यांच्या घरी ईडीचे अधिकारी  छापा टाकण्यासाठी गेले असता, त्यांच्यावरही हल्ला करण्यात आला होता. त्यामुळे या नेत्याविरोधात लुकआउट नोटीसदेखील जारी करण्यात आली आहे.(Trunmul Congress)


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here