सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा | निवाणे येथील यशवंतराव चव्हाण विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा शनिवारी (दि. १८) रोजी शाळेच्या प्रांगणात उत्साहात संपन्न झाला. दिप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. आपल्या आई वडीलांना अनाथाश्रमाचा दरवाजा पाहायची दुर्दैवी वेळ येणार नाही. यांची काळजी आपण सर्वांनी घ्यावी, ज्याचे घरी आई वडील सुखी व समाधानी असतील. तोच खरा श्रीमंत असतो असे प्रतिपादन के.बी.सोनवणे यांनी याप्रसंगी केले. पी.टी.गुंजाळ,डी.डी.आहेर, ए.के.सोनवणे, बच्छाव सर, एन.आर सोनवणे, जी.के सोनवणे, डि.एस पवार, संगिता आहेर, क्रिडा प्रशिक्षणक दादा गांगुर्डे आदी शिक्षकांनी आपल्या भाषणातून मोलाचे मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला दिवंगत शिक्षक व दिवंगत विद्यार्थी यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात करून मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. व तब्बल तीस वर्षांनी एकत्रित आलेल्या सर्व विद्यार्थ्यांनी आपली स्वतःची ओळख करून दिली. अनेक विद्यार्थ्यांनी राजकीय, शैक्षणिक, व्यापार,कृषी, मार्केटिंग,कला क्षेत्रात स्वतःला झोकून घेत आपली वेगळी ओळख निर्माण करत कर्तृत्व सिद्ध केले आहे.प्रकाश काकुळते यांनी आपल्या कलेला व्यावसायिक स्थान देत त्यांचे प्रोडक्ट दुबई व कॅनडा या देशांत पोहचले आहेत, किशोर चव्हाण, संजय रौंदळ यांनी देखील राजकीय क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला आहे.
Deola | खर्डे येथे शिवजयंती निमित्ताने जय्यत तयारी; विविध कार्यक्रमांचे आयोजन
तीस वर्षांनंतर एकत्र आलेल्या सर्वच वर्गमित्र, मैत्रीणींच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता.सर्वच आपल्या भुतकाळातील आठवणीत दंग झाले होते.कार्यक्रम संपल्यानंतर जड पावलांनी सर्वांनी निरोप घेतला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गोविंद देवरे यांनी तर सुत्रसंचलन प्रतिभा सोनवणे व किशोर चव्हाण यांनी केले, अविनाश देवरे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
यावेळी तत्कालीन शालेय कर्मचारी माधव मोरे, शिवाजी शिरसाठ यांसह तत्कालीन विद्यार्थी नंदकिशोर जाधव,अशोक रौंदळ, संदिप आहेर, प्रशांत आहेर, अशोक रौंदळ, नारायण मुंडावरे, हंसराज आहेर, साहेबराव मोरे, संदिप वेशी, भास्कर आहेर, सुनिल आहेर, प्रकाश काकुळते, गोकुळ आहेर, नारायण आहेर, सुनिल शिंदे, नारायण पाटील,संजय निकम, रविंद्र आहेर, सुरेश सोनवणे, पांडुरंग आहेर, युवराज आहेर, बळवंत आहेर, लता रौंदळ, दादा सोनवणे, विनोद कोठावदे, बाळासाहेब थोरात, अनिल आहेर, अंजना पवार, मिना आहेर, बापु आहेर, सुनिता गवळी, अभिमन वाघ, कल्पना जगताप, तुळसाआहेर, शारदा अहिरे, रंजना घोलप, यशोदा वाघ, मनिषा वाघ, बाळू आहेर, सुनंदा पाटील, संगिता जाधव, सायरा शेख, हिरामण आहेर, प्रभाकर आहेर, सुनिता रौंदळ, आदिंसह तत्कालीन विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम