Shiv Sena Candidate | आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांची जोरदार तयारी सुरू आहे. दोन्ही गोटात जागावाटपावरून धुसफूस सुरू असून, ज्या जागांचा तिढा सुटला आहे. त्या जागांवरील उमेदवारांची घोषणा केली जात आहे. महाविकास आघाडीतून ठाकरे गट आणि कॉंग्रेसने आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. मात्र, तरीही काही जागांवरून महायुती आणि महाविकास आघाडीतही नाराजी नाट्य सुरू आहे. (Shiv Sena Candidate)
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीत सांगली या जागेवरून तर, महायुतीत यवतमाळ आणि नशिक या जागांवरून रस्सीखेच सुरू आहे. तर, यानंतर आज शिंदे गटांकडून आपल्या काही जागांवरील उमेदवारांची यादी जाहीर केली जाऊ शकते. भाजपने याधीच आपल्या उमेदवारांची नावं जाहीर केली आहे. मात्र इतर दोन्ही पक्षांच्या उमेदवारांची नावे अद्यापही गुलदस्त्यात आहे. काल मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांमध्ये बैठक झाली असून, यात उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती समोर आली आहे. (Shiv Sena Candidate)
Shivsena Candidate | नाशिकमध्ये ठाकरेंनी पत्ता बदलला; वाजेंना लोकसभेची संधी
तर, अखेर अनेक दिवसांपासून नाशिकमध्ये सुरू असलेले नाराजी नाट्य हे संपले असून, नाशिकची जागा ही शिवसेना शिंदे गटाकडेच राहणार आहे. आणि येथून हेमंत गोडसे यांनाच उमेदवारी दिली जाणार असल्याचीही माहिती समोर आली आहे. तर, यातच आता शिंदे गटाची संभाव्य यादी समोर आली आहे. तर यानुसार नाशिकमधून भुजबळांना उमेदवारी दिली जाण्याची चर्चा असून, दुसरीकडे हेमंत गोडसेंच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती आहे. अखेर शिवसेनेच्या १२ उमेदवारांची नावं निश्चित झाली असून, संभाव्य यादी समोर आली आहे. (Shiv Sena Candidate)
Shiv Sena Candidate | शिवसेना उमेदवारांची संभाव्य यादी
1) रामटेक – राजू पारवे
2) बुलढाणा – प्रतापराव जाधव
3) यवतमाळ-वाशिम – भावना गवळी
4) हिंगोली – हेमंत पाटील
5) कोल्हापूर – संजय मंडलिक
6) हातकंणगले – धैर्यशील माने
7) नाशिक- हेमंत गोडसे
8) मावळ – श्रीरंग बारणे
9) शिर्डी – सदाशिव लोखंडे
10) दक्षिण- मध्य मुंबई – राहुल शेवाळे
11) कल्याण-डोंबिवली – डॅा. श्रीकांत शिंदे
BJP loksabha Candidate | भाजपाची दुसरी यादी जाहीर; भारती पवार आणि सुभाष भामरे यांनाच पुन्हा उमेदवारी
मात्र, अजूनही काही मतदारसंघांचा तिढा कायम असून, यात पुढील उमेदवारांच्या नावाची चर्चा आहे. (Shiv Sena Candidate)
12) ठाणे – (रवी फाटक यांना उमेदवारी मिळू शकते)
13) दक्षिण मुंबई- (यशवंत जाधव यांना उमेदवारी मिळू शकते)
14) उत्तर पश्चिम – ( गोविंदा यांना उमेदवारी मिळू शकते)
15) छत्रपती संभाजी नगर (सक्षम उमेदवाराचा शोध सुरू)
दरम्यान, आज महायुतीच्या उमेदवारांची अधिकृत यादी जाहीर होणार असून, यात मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री ४८ जागांवरील उमेदवार अधिकृत रित्या घोषित करणार असल्याची माहिती समोर आली आहे. (Shiv Sena Candidate)
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम