Akrosh Morcha : राज्यभरात पावसाने पुन्हा एकदा जोर धरला असून वर्ध्यातील, करंजा तालुक्यात सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होत आहे. कपाशीसोबतच, संत्र, मोसंबी आणि आता सोयाबीनच्या बागांना देखील पावसामुळे धोका निर्माण झाला आहे. तेव्हा सरकारने तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी. सोबत इतर काही मागण्या करत शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढला.
Deola | कनकापुर येथे विद्यार्थी व ग्रामस्थांच्या वतीने तीन हजार रोपांची लागवड
मागील काही दिवस सतत पाऊस पडत असल्यामुळे संत्रा व मोसंबीच्या बागांमध्ये फळगळती झाली असून आंबिया बहराची 75 टक्के फळगती झाली आहे. बुरशी व कीडनाशक औषधांची फवारणी करून देखील ही फळगळती कमी होत नसून संत्रा आणि मोसंबीची झाडे पिवळी होऊन मरून पडत असल्याची बाब समोर आली आहे. अतिवृष्टी आणि बुरशीजन्य रोगांअवी वीस ते पंचवीस वर्षांची मेहनत घेऊन जगवलेली झाडे मरून पडताना पहावी लागत आहेत. त्यामुळे शेतकरी आता हवालदिल झाला आहे. अनेक ठिकाणी ओल्या जमिनीमुळे अंतर मशागत करण्यात येत नाहीये.
Deola | देवळा तालुक्यात रिक्त अंगणवाडी मदतनीस पदांसाठी भरती प्रक्रिया
ई-पीक पाहणी करून लवकरात लवकर नुकसान भरपाई द्यावी
कापूस, सोयाबीन, तूर व ज्वारी या पिकांची वाढ खुंटली असून त्यांच्यावर रोगाचा प्रभाव वाढत आहे. तसेच या रोगाला नियंत्रणात आणण्यासाठी शेतकऱ्यांना प्रचंड खर्च येत आहे. तेव्हा सरकारने लवकरात लवकर पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी आता शेतकऱ्यांकडून केली जात आहे. सर्व शेतकऱ्यांना ई-पीक तपासणी करिता नोंद करणे शक्य नाही, त्यामुळे शासनानेच पुढाकार घेत ई-पीक तपासणी करून लवकरात लवकर नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी करत शेतकऱ्यांनी तहसीलदार कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढला. या मोर्चातून तहसीलदार टिपरे यांना निवेदन देण्यात आले. मोर्चानंतर सभेचे आयोजन केले होते ज्यामध्ये नितीन भांगे, प्रा. सुभाष अंधारे, मनोज भांगे, संदीप भिसे, हरिभाऊ धोटे, प्रदीप शेटे, केशव भक्ते, युवराज देशमुख, विभाकर ढोले यांच्यासोबत गावातील शेतकऱ्यांनी हजेरी लावली.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम