Drunk Police Officer : सदरक्षणाय खलनिग्रहणाय हे ब्रीदवाक्य घेऊन आपल्या सुरक्षिततेची जबाबदारी निभावणाऱ्या पोलिसांकडूनच जळगावमध्ये दारू पिऊन धिंगाणा घालण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पोलीस वर्दीत एका बारमध्ये बसून मद्यपान करणाऱ्या पोलीसानी मद्यधुंद अवस्थेत बारमध्ये हाणामारी केल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश रेड्डी यांनी संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली असता दोषी पोलीस अधिकाऱ्याला निलंबित केले गेले आहे. पोलीस कॉन्स्टेबल संदीप धनगर असे त्या कर्मचाऱ्यांचे नाव असून ते पोलीस अधिकारी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यातील असल्याचे पोलीस अधीक्षकांच्या अहवालाअंती समोर आले.
Nashik Crime | संतापजनक..! नाशिकमध्ये शिक्षकाकडून चिमूरडीचा विनयभंग; चार दिवसांत दुसरी घटना
दोषी पोलीस कर्मचारी निलंबित
मुक्ताईनगर पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल संदीप धनगर यांच्याकडून पोलीस गणवेशातच हॉटेल बारमध्ये मद्यपान करून दारूच्या नशेत हाणामारी केल्याचा प्रकार घडला. संपूर्ण प्रकरण सोशल मीडियावर व्हायरल झाले. प्रकरणासंबंधीत माहिती लागताच जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी दोषी कर्मचाऱ्याला निलंबित करण्याचा आदेश दिले. एवढा प्रकार घडूनही याप्रकरणी कोणीच तक्रार नोंदवली नाही. यामुळे गुन्हा दाखल झाला नाही. असे पोलिसांच्या अहवालातून समोर आले.
Deola Crime | देवळा तालुक्यात चोरीचे सत्र सुरूच; एका रात्रीत 13 दुकानं फोडली
नेमकं काय घडलं
भास्कर मार्केट परिसरातील एका बारमध्ये गणवेशात बसून मद्यपान करणाऱ्या पोलिसांमध्ये जोरदार वाद झाला व हाणामारी देखील झाली. हा संपूर्ण प्रकार रविवारी 25 ऑगस्ट रोजी घडला. या प्रकरणी मुक्ताईनगर पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल संदीप धनगर यांना जिल्हा पोलीस अधीक्षकांनी निलंबित केले असून निलंबन काळात दोषी संदीप धनगर याला मुख्यालयात ठेवण्यात येणार आहे. गणवेशात मद्यपान केल्यामुळे धनगर याला निलंबित केले गेले असून याप्रकरणी संपूर्ण चौकशी करण्यात येणार आहे. तरी संपूर्ण प्रकरणात कोणाकडूनही फिर्याद दाखल केली गेली नसल्यामुळे गुन्हा दाखल झाला नसून फिर्याद दाखल होताच योग्य ते कलम लावून गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे पोलीस अधीक्षक डॉ. रेड्डी यांच्याकडून सांगण्यात आले आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम