सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा | कनकापुर/कांचणे गावांत शुक्रवारी दि.२३ रोजी शालेय विद्यार्थी व ग्रामस्थांनी मिळून चिंच, आवळा व बांबू अशा प्रकारच्या एकूण तीन हजार रोपांची लागवड केली. या वृक्ष लागवडीच्या उपक्रमास खर्डे येथील इंदिरा गांधी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी वृक्षारोपणा बरोबरच ऐतिहासिक अशा कांचन किल्ल्याचा निसर्गरम्य परिसराचा आनंद लुटत एकत्रित वन भोजनाचा आस्वाद घेतला.
Deola | देवळा पोमोग्रेनेट ऍग्रो फॉर्मर फ्रोडूसर कंपनीचा स्तुत्य उपक्रम
देवळा तालुक्यातील पश्चिम भागातील अतिदुर्गम अशा कणकापूर कांचने ग्रामस्थ, ग्रुप ग्रामपंचायतीच्या व देवळा पोमोग्रेनेट ऍग्रो फॉर्मर फ्रोडूसर कंपनी व टेक्नो सर्व्ह टीमच्या वतीने कनकापुर येथे मियावाकी वन लागवड प्रकल्पाचे 15 ऑगस्ट रोजी वृक्ष लागवड सप्ताहाचे उद्घाटन करण्यात आले होते. या सप्ताहाच्या अंतीम टप्प्यात शुक्रवारी दि.२३ रोजी खर्डे येथील इंदिरा गांधी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक एस.एल. आहेर व सर्व शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या विशेष सहाय्यातुन कनकापुर स्मशानभूमी समोरील मोकळ्या जागेत दोन हजार चिंच, पाच हजार आवळा व एक हजार भरीव बांबू अशी तीन हजार रोपांची लागवड केली.
Deola | देवळ्यात भव्य दहीहंडी उत्सवाचे आयोजन; खान्देशी स्टार लावणार हजेरी
याप्रसंगी ग्रामपंचायत सरपंच बारकु वाघ, उपसरपंच जगदीश शिंदे, ग्रा पं सदस्य गोविंद बर्वे, कर्मचारी प्रकाश शिंदे, गावातील ग्रामस्थ हिरामण बच्छाव, मुकेश महाराज बर्वे, भाऊसाहेब शिंदे, बाजीराव बकुरे, शिवा बकुरे, संजय शिंदे, योगेश गांगुर्डे, हेमंत जगताप, नानू खैरनार, ओम बकूरे व कंपनीचे संचालक यशवंत देवरे, कर्मचारी मयूर ठाकरे, अविनाश निकम, अलिषा समल, इंदिरा गांधी विद्यालयाचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षक, कर्मचारी उपस्थित होते. या ठिकाणी वृक्षारोपणासाठी विशेष सहकार्य केल्याबद्दल मुख्याध्यापक एस.एल आहेर यांचा सरपंच बारकु वाघ, हिरामण बच्छाव यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कंपनीचे सचिव व उपसरपंच जगदीश शिंदे यांनी विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवडीसाठी प्रोत्साहन दिल्याबद्दल शाळेचे व विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम