Helicopter Crash | पुण्यामध्ये खाजगी हेलिकॉप्टर कोसळलं; व्हिडिओ झाला व्हायरल!

0
22

पुणे : मुंबईहून हैदराबादला जाणाऱ्या खाजगी हेलिकॉप्टरचा पुण्यातील पौड गावात क्रॅश झाल्याची घटना आज घटली. हेलिकॉप्टर मध्ये 4 लोक प्रवास करत असल्याची माहिती एसीपींकडून देण्यात आली आहे. काही तांत्रिक बिघाडांमुळे हे हेलिकॉप्टर कोसळल्याचा प्राथमिक अंदाज आहे. ज्याचे मुख्य कारण अजूनपर्यंत समजू शकले नसून रेस्क्यू ऑपरेशन सुरू असल्याची माहिती देखील एसीपींनी दिली आहे. मुंबईमधील ग्लोबल कंपनीचं हे खाजगी हेलिकॉप्टर असून मुंबईवरून विजयवाडा करिता रवाना झाले असता पुणे जिल्ह्याच्या पौड गावातील एका शेतामध्ये तांत्रिक बिघाडामुळे कोसळले. या हेलिकॉप्टर मध्ये पायलट सह ३ प्रवासी प्रवास करत होते. या दुर्घटनेत पायलटला दुखापत झाली असून त्याला उपचारांकरिता रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अन्य 3 प्रवाशांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती समोर येत आहे.

अपघाताची घटना सोशल मीडियावर व्हायरल

काही दिवसांच्या विसाव्यानंतर राज्यभरात पावसाने पुन्हा एकदा हजेरी लावली असून पुण्यामध्ये सकाळपासून मुसळधार पाऊस पडत होता. तेव्हा पावसामुळे हेलिकॉप्टर क्रॅश झाले असावे असा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. पण क्रॅश होण्यामागचे अधिकृत कारण अजूनही समजू शकले नाही. AW 139 हे हेलिकॉप्टरचे नाव असून हेलिकॉप्टर क्रॅश होतानाचा संपूर्ण थरार सोशल मीडियावर व्हायरल होताना पाहायला मिळतोय. एका व्हिडिओमध्ये हेलिकॉप्टरच अचानकपणे संतुलन बिघडून ते बाजूच्या शेतामध्ये क्रश झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. तर दुसऱ्या व्हिडिओमध्ये स्थानिक लोकांसह पोलीस प्रशासन घटनास्थळी रेस्क्यू मोहीम राबवताना दिसतंय. हेलिकॉप्टरचा कॅप्टन या क्रॅशमध्ये जखमी झाले. त्यांच्यावरती रुग्णालयामध्ये उपचार सुरू असून दीर भाटिया, अमरदीप सिंग आणि एस. पी. राम या इतर तीन प्रवाशांची प्रकृती स्थिर आहे. ग्लोबल हेक्ट्रा कंपनीच्या या खाजगी हेलिकॉप्टरने जुहू येथून हैदराबादला जाण्यासाठी उड्डाण केले होते.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here