सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा | एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प देवळा कार्यालया अंतर्गत कार्यरत रिक्त असणाऱ्या अंगणवाडी मदतनीस पदांसाठी भरती प्रक्रिया होणार आहे. पात्र उमेदवारांनी या पदासाठी अर्ज करावेत असे आहवान देवळा प्रकल्पाचे बाल विकास प्रकल्प अधिकारी जयश्री नाईक यांनी केले आहे. अंगणवाडी मदतनीस पदासाठीची किमान शैक्षणिक पात्रता ही बारावी उतीर्ण उमेदवार असावा. वय १८ वर्षे ते ३५ वर्षे ही वयोमार्यादा असुन विधवा महिलांसाठी कमाल वयोमर्यादा ४० वर्षे असणार आहे.
Deola | देवळा येथील कला शिक्षक भारत पवार ‘सह्यादी रत्न’ पुरस्काराने सन्मानित
उमेदवार हा त्याच महसुली गावातील रहिवासी असावा. इच्छुक व पात्र गरजु महिला उमेदवारांनी अर्ज २२ ऑगस्ट २०२४ ते ४ सप्टेंबर मार्च २०२४ या दरम्यान कार्यालयीन दिवशी व वेळेत करावेत. खालील दिलेल्या अंगणवाडी केंद्रनिहाय ४ अंगणवाडी रिक्त पद असणाऱ्या अंगणवाडी मदतनीस पदासाठी भरती प्रक्रिया राबविली जाणार आहे. अर्जदार उमेदवारांनी अधिक माहितीसाठी संबधित ग्रामपंचायत कार्यालय अथवा प्रकल्प कार्यालयाशी संपर्क साधावा. ग्रामपंचायतीचे नाव : सावकी – आदिवासी वस्ती व पवार वस्ती, सुभाष नगर आणि श्रीरामपूर येथे प्रत्येकी एक रिक्त जागा भरण्यात येणार असल्याची माहिती नाईक यांनी दिली.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम