Fake Police | खोटा पीएसआय बनून प्रेमी युगलांना लुबाडायचा; एका ‘ॲप’मुळे झाला पर्दाफाश

0
66
Fake Police
Fake Police

Fake Police | वसई :  वसई स्थानकाला लागून असलेला ‘स्काय वॉक’ हा निर्मनुष्य असल्यामुळे प्रेमीयुगुलांचे येथे वरचेवर येणे जाणे असते. याच गोष्टीचा फायदा घेत राहुल मोरे हा बोगस पोलीस बनून येथे येणाऱ्या अनेक प्रेमी युगालांकडून पैसे उकळत होता. राहुल मोरे वसई विरार महानगरपालिकेत आरोग्य विभागाचा चपरासी म्हणून कार्यरत होता. परंतु गैरवर्तवणुकीमुळे त्याला निलंबित करण्यात आले होते.

Fake Police | नेमकं प्रकरण काय..?

वसई (Vasai) स्थानकानजिकचा हा स्कायवॉक जास्त गजबजाटीचा परिसर नसल्यामुळे येथे प्रेमीयुगलं, जोडपे यांचे वरचेवर येणे जाणे असते. हीच गोष्ट लक्षात ठेवत आरोपी राहुल मोरे येथे येणाऱ्या तरुण-तरुणींना स्वतःची खोटी ओळख करून देत बोगस पोलीस बनुन पैसे उकळायचा. प्रकरण वाढू नये, गोष्ट घरापर्यंत जाऊ नये. या भीतीने अनेक तरुण तरुणी या धमकीला बळी पडायचे.(Fake Police)

हीच गोष्ट विरारमध्ये वास्तव्यास असलेले 48 वर्षांचे फिर्यादी यांच्यासोबतही घडली. ते आपल्या मैत्रिणीसोबत तेथे आले असता राहुल मोरे याने त्यांना स्वतःची ओळख पीएसआय जगताप अशी करून देत त्यांचा नंबर घेतला व हे प्रकरण घरी कळवेल अशी धमकी देत पैशांची मागणी केली. धमकीला घाबरत फिर्यादींनी सुरुवातीला 50 हजार रुपये देत प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला. परंतु नंबर मिळाल्यामुळे आरोपीने जवळजवळ दोन महिन्यांमध्ये ब्लॅकमेल करत फिर्यादींकडून 3 लाख 60 हजार इतकी रक्कम उकळली.

Badlapur Child Abuse | बदलापूर अत्याचार प्रकरणी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री ॲक्शन मोडवर

‘ट्रू कॉलर’ने उघडकीस आणले सत्य

पैसे दिले नाही तर प्रकरण घरी कळेल या भीतीपायी फिर्यादी आरोपीला पैसे देत राहिले. असाच एकदा पैसे मागण्यासाठी आलेला कॉल फिर्यादींच्या पत्नीने उचलला व त्यांना संशय आला. त्यांनी प्रकरण तिथेच न सोडता तो नंबर आपल्या फोनवरती डायल केला. तेव्हा ट्रू कॉलर ॲप वर PSI जगताप असे न येता राहुल मोरे नाव आले आणि त्यांचा संशय खरा ठरला. त्यानंतर लगेचच माणिकपूर पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आणि पोलिसांनी राहुल मोरेला अटक केली. त्याच्यावर 384, 170 आणि 50 अशी कलमे लावून गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पोलिसांचे नागरिकांना आवाहन

आरोपी राहुल मोरे सध्या पोलिस कोठडीत असून त्याने बऱ्याच लोकांना लुबाडल्याचा अंदाज पोलिसांकडून वर्तवला जात आहे. तरी ज्या लोकांना राहुल मोरे यांनी फसवले आहे किंवा पैसे उकळले आहेत. त्यांनी माणिकपूर पोलीस स्थानकात येऊन तक्रार दाखल करावी, असे आवाहन पोलिस निरीक्षक राजू माने यांनी नागरिकांना केले आहे.

Badlapur Case | अशा नराधमांना पब्लिकली फाशी द्या, सुप्रिया सुळेंचा संताप; आंदोलन चिघळलं


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here