Sexsual Abuse Case | बाप-लेकीच्या नात्याला काळीमा; पित्याकडूनच पोटच्या मुलीवर अत्याचार

0
74

Sexsual Abuse Case : काही दिवसांपूर्वी बदलापूर येथे दोन चिमुकल्यांवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ माजवली होती. त्यानंतर महाराष्ट्राच्या इतर भागातून अशाच घटना समोर येत असल्यामुळे राज्याभरातून रोष व्यक्त केला जात होता. यातच आता पुन्हा एकदा मन सुन्न करणारी घटना उघडकीस आली आहे.

Akola Harassment Case | राज्यात विकृतांचा कल्लोळ ! अश्लील व्हिडिओ दाखवत शाळेच्या शिक्षकाकडूनच…

शाळा, इस्पितळ यांसारख्या ठिकाणी अत्याचार झाल्यानंतर आता मुली स्वतःच्या घरात देखील सुरक्षित नसल्याची बाब या घटनेतून समोर येत आहे. कारण, जन्मदात्या पित्यानेच पोटच्या गोळ्यावर लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. मुंबईच्या मालाड येथे हा प्रकार घडला असून पत्नीने अत्याचाराला वाचा फोडत पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली. याप्रकरणी नराधम पित्यावर पोक्सो कलमांतर्गत दिंडोशी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Badlapur Case | अशा नराधमांना पब्लिकली फाशी द्या, सुप्रिया सुळेंचा संताप; आंदोलन चिघळलं

नेमकी घटना कधी घडली? 

मुंबई येथील मालाड परिसरात ही घटना घडली असून पीडित मुलगी अवघ्या नऊ वर्षांची आहे. ही घटना जून महिन्यात घडली असून घरात कोणीही नसताना नराधम पित्याकडून नऊ वर्षांच्या चिमुकली सोबत अश्लील चाळे करून तिचा विनयभंग करण्यात आला होता. त्यानंतरही अत्याचाराचे हे सत्र संपले नसून नराधमाने अनेकदा मुलीवर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला होता. या संपूर्ण प्रकरणामुळे चिमुकली घाबरली होती. शेवटी हिम्मत दाखव तीने संपूर्ण प्रकार आईला सांगितला. स्वतःच्या पतीने पोटच्या लेकीवर लैंगिक अत्याचार केल्याचे समजतात पत्नीला मानसिक धक्का बसला. परंतु मुलीवर झालेल्या अत्याचारा विरोधात तिने सोमवारी रात्री दिंडोशी पोलीस ठाण्यात धाव घेत पतीचे घृणास्पद कृत्य पोलिसांना सांगितले व पतीविरुद्ध तक्रार दाखल केली. या प्रकरणाची वरिष्ठांकडून गंभीर दखल घेण्यात आली असून महिलेच्या तक्रारीनंतर लगेचच पोलिसांनी आरोपीविरुद्ध पोक्सो कलमांतर्गत लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे तसेच पुढील तपास सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here