Sharad Pawar | ‘लोकशाही उध्वस्त होत आहे’; ईव्हीएमच्या मुद्द्यावरून शरद पवारांनी व्यक्त केली खंत

0
27
#image_title

Sharad Pawar | महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून आता आठवडा उलटून गेला असला तरी राज्यात सरकार स्थापन झालेले नाही. त्यावरून आता विरोधकांकडून महायुतीवर निशाणा साधला जात आहे. “बहुमत असूनही राज्यात सरकार बनत नाही. शपथविधी 5 डिसेंबरला होण्याची शक्यता आहे. याचा अर्थ लोकांच्या बहुमताला महत्त्व नाही. जे काही चालले आहे. ते राज्यासाठी अशोभनिय आहे.” असे म्हणत शरद पवार यांनी युती सरकारवर टीका केली आहे. त्याचबरोबर ईव्हीएमवरून देखील त्यांनी यावेळी शंका उपस्थित केली आहे.

Sharad Pawar NCP | शरद पवार ॲक्शन मोडवर; ऑनलाइन बैठकीत उमेदवारांना महत्त्वाच्या सूचना

शरद पवार बाबा आढावांच्या भेटीला

शरद पवारांनी पुणे येथे बाबा आढाव यांच्या आंदोलनस्थळी भेट दिली असून गेल्या तीन दिवसांपासून बाबा आढाव ईव्हीएम विरोधात आंदोलन करत आहेत. आढाव यांच्या भेटीनंतर शरद पवार यांनी माध्यमांशी संवाद साधत त्यांनी, “महाराष्ट्रात निवडणुकीच्या निकालानंतर जी अवस्था आहे. त्यातून बाबा आढाव हे आत्मक्लेष आंदोलन करताय. या निवडणुकीत ज्याप्रकारे सत्तेचा गैरवापर व पैशाचा महापूर झाला, ते यापूर्वी कधीच पाहिले नव्हते. या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात पैसा व सत्तेचा गैरवापर करून संपूर्ण निवडणूक यंत्रणा हाताशी घेतली गेली. परिणामी लोकांची अस्वस्थता वाढली असून संसदेबाहेर जे भेटले त्या सगळ्यांना जयप्रकाश नारायण यांची आठवण झाली. आज धोरणात्मक पाऊल टाकायची गरज आहे. बाबा आढाव यांनी तो पुढाकार घेतला आहे. ते आज महात्मा फुले यांच्या संबंधित वास्तूत आत्मक्लेश आंदोलन करत आहेत. बाबांच्या या आंदोलनांना सामान्यांना एक प्रकारे दिलासा मिळत आहे. बाबा आढाव यांनी एकट्यानेच ही भूमिका घेणे हे सोयीचे नाही. तर शेवटी जनतेचा उठावंच या सगळ्या प्रश्नांची लढाई लढेल.” असे त्यांनी यावेळी म्हटले आहे.

Sharad Pawar | ‘व्होट जिहाद’च्या टिकेवरून शरद पवारांनी फडणवीसांना फटकारले!

“संपूर्ण संसदीय लोकशाही पद्धती यावरच राज्यकर्त्यांचा आघात आहे” – शरद पवार

त्याचबरोबर, “संसदीय लोकशाही उध्वस्त होण्याचे चित्र आज देशात आहे. या देशाची सूत्र ज्यांच्या हाती आहेत. त्यांना त्याचं काहीच पडलेले नाही. इतकी चर्चा देशात आहे. संसदेत हा प्रश्न उपस्थित करण्याचा प्रयत्न दोन्ही सभागृहात विरोधकांकडून करण्यात आला. तर त्यांना बोलू दिले जात नाही. 6 दिवसांच्या अधिवेशनामध्ये रोज सकाळी 11 वाजता दोन्ही सभागृहाचे विरोधी पक्षनेते हा मुद्दा मांडायला ‘आम्हाला परवानगी द्या.’ अशी मागणी करतात. पण 6 दिवसात एकदाही मंजुरी दिली जात नाही. देशाच्या कोणत्याही प्रश्नांवर संसदेत चर्चा होऊ शकली नाही. म्हणजे संपूर्ण संसदीय लोकशाही पद्धतीवरच राज्यकर्त्यांचा आघात आहे. लोकांना जागृत करावे लागेल. उठाव करायला हवा. आज त्यांची आवश्यकता आहे. बाबांच्या या आंदोलनामुळे हे आज ना उद्या झाल्याशिवाय राहणार नाही.” असा इशारा देखील त्यांनी यावेळी दिला आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here