Sharad Pawar | शरद पवारांची पिंपळगाव बसवंत येथे सभा पार पडली. आश्चर्य म्हणजे ही सभा ऐनवेळी ठरली असून सभेत शरद पवारांनी केलेल्या भाषणात बंडखोर आमदाराचा उल्लेख न केल्याने उलट सुलट चर्चांना सुरुवात झाली आहे. याउलट पवारांनी त्यांच्या दिंडोरी येथील सभेत बंडखोर आमदार नरहरी झिरवाळ यांच्यावर मात्र हल्लाबोल केला होता.
Sharad Pawar | ‘मत देण्याएवढी झिरवाळांची लायकी नाही’; शरद पवारांचे झिरवळ्यांबाबत खळबळजनक विधान
पवारांच्या भाषणात आघाडीच्या उमेदवाराचा उल्लेख नाही
शरद पवारांची निफाड मतदार संघातील महाविकास आघाडीतील उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार अनिल कदम यांच्या प्रचाराकरिता पिंपळगाव बसवंत येथे सभा पार झाली. या सभेची माजी आमदार अनिल कदम यांनी जोरदार तयारी केली होती. मात्र पवारांनी सभेतील भाषणादरम्यान त्यांचा उल्लेख केलाच नसून ‘माजी आमदार कदम यांना मतदान करा’ असे देखील म्हटले नाही. तर आश्चर्य म्हणजे शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत बंडखोरी करणारे विद्यमान आमदार दिलीप बनकर हे या मतदारसंघात प्रतिस्पर्धी उमेदवार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाने त्यांना उमेदवारी दिली असून दिलीप बनकर यांच्या विषयी देखील ते काही बोलले नाहीत. त्यामुळे भाषणानंतर चर्चांना उधाण आले आहे.
राष्ट्रवादीचा उमेदवार नसतानाही घेतली सभा
शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे अनिल कदम हे निफाडचे माजी आमदार आहेत. गेले काही महिने कदम राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाचे नेते शरद पवार यांच्या अधिक जवळ गेले होते. मग एकत्रित विमान प्रवास असो भेटीगाठी असो. यामुळे अनेकांना निवडणूक यादी निफाड मतदारसंघ शरद पवार यांचा मानला जात होता व कदम हे शरद पवार पक्षाची उमेदवारी घेतील अशा चर्चा होत्या. परंतु माजी आमदार कदमांनी शिवसेना उद्धव ठाकरे पक्षालाच पसंती देत उमेदवारी घेतल्यामुळे निफाड मतदार संघात सध्या शरद पवार यांच्या पक्षाचा उमेदवार नाही. तरी देखील त्यांनी ही सभा घेतली. पवारांनी ही सभा का घेतली असावी? याबद्दल अनेकांना आश्चर्य वाटत असून त्याहीपेक्षा अधिक आश्चर्य पिंपळगाव बसवंत येथे सभा घेतल्यावर पवार यांच्याकडून महाविकास आघाडीचे उमेदवार कदम आणि राष्ट्रवादीचे बंडखोर आमदार बनकर यांपैकी कोणाचाही उल्लेख करण्यात आला नसल्यामुळे राजकीय वर्तुळात हा चर्चेचा विषय ठरला आहे.
Sharad Pawar | ‘महाराष्ट्राचे लौकिक या राजकर्त्यांनी घालवले’; नाशिकच्या सभेत शरद पवारांचा घणाघात
विरोधकांच्या हाती आयते कोलीत
दरम्यान, शरद पवार यांनी या भाषणात महिला आरक्षण, युवकांसाठी उपक्रम, महिलांची सुरक्षा, महायुती सरकारचा गैरकारभार व महाविकास आघाडीची पंचसूत्री यावर भर दिला. यामुळे पवार यांची पिंपळगाव बसवंत येथील सभा मतदारांनी गोंधळात टाकणारी ठरली असून यामुळे कदम यांच्या विरोधकांच्या हाती आयते कोलीत लागले असून निवडणुकीच्या तोंडावर त्यांची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम