Sharad Pawar | ‘मत देण्याएवढी झिरवाळांची लायकी नाही’; शरद पवारांचे झिरवळ्यांबाबत खळबळजनक विधान

0
59
Sharad Pawar
Sharad Pawar

Sharad Pawar | विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराकरिता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आज नाशिक दौऱ्यावर असून त्यांची दिंडोरी येथे सभा झाली. या सभेत पवार यांनी बंडखोर उमेदवार नरहरी झिरवाळ यांचा चांगला समाचार घेतला. त्यांनी, “झिरवाळ हे मत देण्याच्या पात्रतेचे नाहीत” असे म्हणत त्यांच्यावर निशाणा साधला. दिंडोरी विधानसभा मतदारसंघातील महाआघाडीच्या उमेदवार सुनीता चारोस्कर यांच्या प्रचाराकरिता ते आज दिंडोरीत आले होते. यावेळी त्यांनी सभेमध्ये बंडखोर आमदार नरहरी झिरवाळ यांच्यावर सडकून टीका केली. “झिरवाळ मत देण्याच्या लायकीचा माणूस नाही, तेव्हा त्याला मतदान करू नका.” असे आवाहन नागरिकांना केले.

Sharad Pawar | ‘महाराष्ट्राचे लौकिक या राजकर्त्यांनी घालवले’; नाशिकच्या सभेत शरद पवारांचा घणाघात

पवारांचा झिरवळाळांवर निशाणा

यावेळी बोलताना पवारांनी नरहरी झिरवाळ यांच्या वागणुकीचे दाखले देत, “2019 साली आम्ही झिरवाळ यांना उमेदवारी दिली. पण निवडून आल्यावर ते अचानक गायब झाले. दिंडोरीत, मुंबईत शोधून देखील ते सापडले नाहीत. आम्ही दिल्लीत शोध घेतला, तपास केल्यावर ते गुडगावला एका फाईव्ह स्टार हॉटेलच्या खोलीत सापडले. आमच्या कार्यकर्त्यांनी त्यांना पकडून आणले. त्यावेळी त्यांनी गयावया केली. हा गरीब माणूस आहे आदिवासी माणूस आहे. म्हणून त्याची चूक आम्ही पोटात घातली. राज्यात सरकार आल्यावर आदिवासी समाजाला प्रतिनिधित्व द्यावे म्हणून मी स्वतः त्यांना विधानसभेचा उपाध्यक्ष करण्याचा निर्णय घेतला. परंतु पुन्हा संधी मिळताक्षणी त्यांनी बंडखोरी केली. आज पुन्हा ते दिंडोरीच्या मतदारांकडे मतं मागत आहेत. त्यांच्यावर विश्वास ठेवायचा नाही. हा माणूस कधी पलटेल, कुठे जाईल याची खात्री नाही. झिरवाळे यांच्यापेक्षा आमच्या उमेदवार सुनीता चारोस्कर कईक पटींनी चांगल्या आहेत. प्रामाणिकपणे काम करतील, मतदारांसाठी कष्ट उचलतील. त्यांना मतदान करून दिंडोरी मतदार संघाच्या आमदार करा.” असे आवाहन यावेळी शरद पवारांनी केले.

Sharad Pawar | 2004 च्या विधानसभा निवडणुकीत ‘या’ कारणासाठी भुजबळांना मुख्यमंत्री केले नाही; शरद पवारांचा खुलासा

शरद पवारांकडून या सभेवेळी बंडखोर नरहरी झिरवाळांबाबत अतिशय गंभीर विधाने करण्यात आली असून त्याला उपस्थित कार्यकर्ते आणि मतदारांकडून जोरदार प्रतिसाद देण्यात आला व झिरवाळ यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. झिरवाळ यांच्या विषयी शरद पवार काय भूमिका घेणार, काय बोलणार? याबाबत सगळ्यांनाच उत्सुकता होती. शरद पवारांच्या या सभेनंतर निवडणुकीच्या निकालावर काय परिणाम पडतो. हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here