मुंबई : राज्यात सध्या मराठा विरुद्ध ओबीसी मुद्दा चांगलाच तापलेला असून, या प्रकरणात राज्याचे ज्येष्ठ नेते म्हणून शरद पवारांनी मध्यस्थी करावी, अशी मागणी जोर धरत आहे. मंत्री छगन भुजबळ, मराठा, ओबीसी आंदोलकांकडून ही मागणी करण्यात आली असून, काल मनोज जरांगे यांनीही शरद पवार, उद्धव ठाकरे आणि नाना पाटोले यांनी मराठा आरक्षणाबाबत आपली भूमिका स्पष्ट करण्यास सांगितले होते.
यानंतर काल शरद पवार हे छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर असताना मराठा आंदोलकांनी ते मुक्कामी असलेल्या हॉटेल रामाच्या बाहेर गर्दी केली आणि त्यांनी आपली भूमिका स्पष्ट करण्याची मागणी केली. यावेळी आंदोलकांसोबत पवर्णणी अर्धा ते पाऊन तास संवादही साधला.(Sharad Pawar on Maratha Protest)
Sharad Pawar on Maratha Protest | मी स्वतः जालना, बीड या जिल्ह्यांमध्ये जाणार
दरम्यान, यानंतर अखेर एका मुलाखतीत शरद पवारांनी (Sharad Pawar) आपली मराठा-ओबीसी आरक्षणाबाबतची भूमिका जाहीर केली आहे. यावेळी ते म्हणाले की,”महाराष्ट्रातील जालना, बीड या जिल्ह्यांमध्ये आरक्षणाच्या मुद्द्यावरून प्रचंड अस्वस्थता आहे. संसदेचं पावसाळी अधिवेशन संपल्यानंतर मी स्वतः तिथे जाऊन तेथील लोकांशी संवाद साधणार आहे. या भागात कटुता, अवविश्वासाचं हे चित्र आहे, ते भयावह असून, यापूर्वी मी कधीही महाराष्ट्रात असं काही ऐकलेलं नाही.
eknath shinde and sharad pawar | शरद पवार-मुख्यमंत्र्यांची तासभर बैठक; बैठकीत काय चर्चा..?
हे असं महाराष्ट्रात यापूर्वी कधीही ऐकलेलं नव्हतं
एका समाजाच्या हॉटेलमध्ये दुसऱ्या समाजाचे लोक चहा घ्यायलाही जात नाहीत, असं यापूर्वी महाराष्ट्रात कधीही ऐकलेलं नाही झालेलं नाही. काहीही करून हे बदलायला हवं. या लोकांमध्ये विश्वास आणि संवाद वाढवला पाहिजे आणि यासाठी आमच्यासारख्या लोकांनी जीव ओतून काम करायला पाहिजे,” असे शरद पवारांनी जाहीर केले.
राज्यकर्त्यांनी दोन्ही समाजांचे गट वाटून घेतलेत
“या प्रकरणात गंमत अशी आहे की, दुर्दैवाने या समाजांचे दोन वेगवेगळे वर्ग पडले आहेत आणि त्या दोन्ही वर्गांना कोणी-कोणी काय तरी सांगत आहे. तर, या वादात आजच्या राज्यकर्त्यांनी दोन बाजू वाटून घेतलेल्या आहे. एका गटाने ओबीसींची बाजू घेतलीय आणि दुसऱ्या गटाने मराठा आंदोलकांची बाजू घेतली आहे. हे योग्य नअसून, आपण दोन्ही समाजांमध्ये सामंजस्य कसं निर्माण कसं करता येईल, यावर अधिक लक्ष देणं गरजेचं आहे.” असे यावेळी शरद पवार म्हणाले.
Sharad Pawar NCP | थोरल्या पवारांनी भाजपची विकेट पाडली; माजी राज्यमंत्री शरद पवारांच्या गळाला
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम