मुंबई : राज्यात सध्या मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा (OBC and Maratha Reservation) मुद्दा पेटलेला असून, यावर तोडगा काढण्यासाठी शरद पवारांनी मध्यस्थी करावी असे अनेक नेत्यांचे मत होते. यासाठी मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनीही पवारांची भेट घेत त्यांना पुढाकार घेण्याची विनंती केली होती.
या भेटीत शरद पवारांनी आपण येत्या एक दोन दिवसांत मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार असल्याचे आश्वासन दिल्याचे मंत्री भुजबळांनी सांगितले होते. दरम्यान, अखेर आज शरद पवारांनी (Sharad Pawar) मराठा ओबीसी आरक्षणप्रश्नी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली असून, यावर त्यांची 15 मिनिटे चर्चा झालेची माहिती समोर आली आहे.
Bhujbal Pawar Meet | भुजबळांनी सांगितले भेटीमागचे कारण; म्हणाले ‘..मला मंत्रीपदाची परवा नाही’
eknath shinde and sharad pawar | आरक्षणप्रश्नी काय निर्णय घेतले याची माहिती दिली
मनोज जरांगे किंवा लक्ष्मण हाके यांना कोणती आश्वासनं सरकारने दिलीत. याबाबत विरोधी पक्षांना विश्वासात घेण्यात आले नाही. तसेच याबाबत माहिती नाही. म्हणून आरक्षणाच्या सर्वपक्षीय बैठकीला आपण अनुपस्थित राहिल्याचे बोलून दाखवले होते. त्यामुळे राज्य सरकारने मराठा आरक्षणप्रश्नी आतापर्यंत काय काय निर्णय घेतले याची माहिती या चर्चेत मुख्यमंत्र्यांनी दिली. या भेटीनंतर आता शरद पवार आणि महाविकास आघाडी काय भूमिका घेणार हे पहावे लागणार आहे.
Bhujbal Pawar Meeting | काल टिका आज भेटीगाठी; पवार-भुजबळ भेटीमागे दडलंय काय..?
आधी आरोप आणि नंतर विनंती
यापूर्वी मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली 9 जुलै रोजी सर्वपक्षीय बैठक बोलवण्यात आली होती. या बैठकीला महाविकास आघाडीचे नेते अनुपस्थित राहिल्याने सत्ताधाऱ्यांनी टिका करत शरद पवारांच्या सांगण्याने विरोधक बैठकीला आले नाही, असे आरोप केले होते. (eknath shinde and sharad pawar)
तर, विरोधकांनीही मराठा आणि ओबीसी आंदोलकांना काय आश्वासनं दिली आणि याप्रश्नी आतापर्यंत सरकारने काय निर्णय घेतले आहेत. याबाबत आम्हाला विश्वासात न घेतल्याने आम्ही बैठकीला अनुपस्थित असल्याचे प्रत्युत्तर दिले होते. दरम्यान, भुजबळांनी या प्रश्नी शरद पवारांची भेट घेत त्यांना मध्यस्थी करण्याची विनंती केल्यानंतर आज एकनाथ शिंदे आणि शरद पवार यांच्यात मराठा आरक्षणप्रश्नी चर्चा झाली आहे. (eknath shinde and sharad pawar)
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम