Bhujbal Pawar Meet | भुजबळांनी सांगितले भेटीमागचे कारण; म्हणाले ‘..मला मंत्रीपदाची परवा नाही’

0
61
Bhujbal Pawar Meet
Bhujbal Pawar Meet

Bhujbal Pawar Meet |  आज सकाळीच राज्याच्या राजकीय वर्तुळातून खळबळ उडवणारी बातमी समोर आली. मंत्री छगन भुजबळ(Chhagan Bhujbal) हे शरद पवारांच्या  (Sharad Pawar)भेटीला त्यांच्या सिल्वर ओक (Silver Oak) या निवासस्थानी दाखल झाले. विशेष म्हणजे अजित पवार गटाच्या काल जनसन्मान सभेत छगन भुजबळांनी शरद पवारांवर ओबीसी मराठा वादावरुन जोरदार हल्लाबोल केला. यानंतर आज सकाळीच ते शरद पवारांच्या भेटीसाठी आले. यामुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली होती. यानंतर आता अखेर या भेटीचा सस्पेन्स संपला असून, स्वतः मंत्री छगन भुजबळांनी या भेटीमागचे कारण सांगितले. भेटीनंतर छगन भुजबळांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

Bhujbal Pawar Meet | दीड तास वेटिंगवर का थांबावं लागलं.? 

मंत्री छगन भुजबळ हे ‘सिल्वर ओक’वर तब्बल दीड तास वेटिंगवर होते. मी अचानक गेलो. मी त्यांच्या भेटीची कुठलीही वेळ घेतलेली नव्हती. त्यांची तब्येत बरी नसल्याने ते झोपलेले होते. त्यामुळे मी थांबलो. त्यांची प्रकृती ठीक नसल्याने ते बिछान्यावरच झोपलेले होते. मी शेजारी खुर्ची टाकली आणि तिथेच त्यांच्याशी बोललो. तसेच मी मंत्री किंवा आमदार म्हणून आलेलो नाही. कुठलीही पक्षीय भूमिका माझी नाही, असे आधीच स्पष्ट केल्याचेही भुजबळांनी सांगितले.

राज्यात मराठा ओबीसी वाद निर्माण झाला असून, या पार्श्वभूमीवर ही भेट होती. “राज्यात काही जिल्ह्यांत स्फोटक परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे राज्याचे ज्येष्ठ नेते म्हणून राज्यात शांतता निर्माण करण्यासाठी तुम्ही काम केलं पाहिजे, अशी विनंती त्यांना केल्याचेही मंत्री भुजबळ म्हणाले. (Bhujbal Pawar Meet)

Bhujbal Pawar Meeting | काल टिका आज भेटीगाठी; पवार-भुजबळ भेटीमागे दडलंय काय..?

…तेव्हाही मराठवाडा पेटला होता 

तसेच शरद पवारांना त्यांनी मराठवाडा विद्यापीठाचे नाव बादलले. तेव्हाची आठवण करून दिली. मराठवाडा विद्यापीठाचे नाव बदलून डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ केले. तेव्हाही मराठवाडा पेटला होता. त्यावेळीही तुम्ही पुढाकार घेतला होता. ही आठवणही करून दिल्याचे भुजबळांनी सांगितले. जरांगे यांचे उपोषण सोडायला मुख्यमंत्री गेले. हाके आणि वाघमारे यांचे उपोषण सोडायला तुम्ही गेले. त्यावेळी त्यांना काय आश्वासनं दिली. याबाबत आम्हाला काहीही माहिती नसल्याचे ते म्हणाले. तुम्हाला राज्याचा चांगला अभ्यास आहे. तुम्ही राज्यातील सर्वात ज्येष्ठ नेते असल्यामुळे तुम्ही हा प्रश्न सोडवण्याबाबत पुढाकार घेतला पाहिजे, अशी त्यांना विनंती केल्याचे भुजबळ म्हणाले. (Bhujbal Pawar Meet)

आरक्षण प्रश्नाबाबत चर्चेसाठी शरद पवार तयार 

येत्या एक दोन दिवसांत मी स्वतः शिंदे यांच्याशी बोलतो. याबाबत दोन चार अभ्यास असलेले लोकं बरोबर घेऊन आम्ही हा प्रश्न कसा सोडवता येईल यावर चर्चा करू, प्रश्न कसं सोडवायचा यावर चर्चा करण्यासाठी शरद पवार तयार असल्याचे भुजबळ म्हणाले. तर, राज्यातील वातावरण शांत रहावं आणि गोरगरिबांची घर जळू नये. हा माझा हेतु असल्याचेही यावेळी मंत्री छगन भुजबळ यांनी स्पष्ट केले.

Chhagan Bhujbal | भुजबळ कोणाच्या इशार्‍याने बोलतात; विरोधकांकडून भुजबळांच्या नार्को टेस्टची मागणी


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here