मुंबई: राज्यच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडवणारी बातमी समोर आली असून, अजित पवार गटात असलेले राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) हे आज अचानक शरद पवारांच्या (Sharad Pawar) भेटीला त्यांच्या सिल्वर ओक (Silver oak) या निवासस्थानी पोहोचले आहे. काल अजित पार गटाच्या मेळाव्यात शरद पवारांवर जहरी टिका केल्यानंतर आज पवार-भुजबळ भेटिमागे नेमके काय दडलंय..? याबाबत चर्चा सुरू असून, या भेटिने राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, या भेटीचे कारण अद्याप गुलदस्त्यात असून, या भेटीने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. (Bhujbal Pawar Meeting)
Chhagan Bhujbal | भुजबळ कोणाच्या इशार्याने बोलतात; विरोधकांकडून भुजबळांच्या नार्को टेस्टची मागणी
Bhujbal Pawar Meeting | भेट गुप्त ठेवण्याचा प्रयत्न..?
गेल्या अनेक दिवसांपासून छगन भुजबळ अजित पवार गटात नाराज असल्याची चर्चा होती. त्यांची भूमिका नेहमी महायुतीच्या प्रवाहाविरोधात दिसून आली. नाशिक लोकसभा मतदार संघात उमेदवारी न मिळाल्याने आणि त्यानंतर राज्यसभेवरही भुजबळांना डावलून सुनेत्रा पवार यांना संधी दिलेने ते पक्षात नाराज असल्याची दबक्या आवाजात चर्चा होती. त्यानंतर ते शिवसेना ठाकरे गटात जाणार असल्याचेही मध्यंतरी बोलले जात होते. त्यानंतर आता काल शरद पवारांवर टिका करून आज भुजबळ हे त्यांची भेट घेण्यासाठी आले आहे. (Bhujbal Pawar Meeting)
शरद पवार प्रकृती ठीक नसल्याने ते गेल्या काही दिवसांपासून कोणालाही भेटत नाहीयेत. पण तरीही त्यांनी छगन भुजबळांना भेटीची वेळ दिली असल्याची माहिती आहे. छगन भुजबळ आणि शरद पवार यांची ही भेट गुप्त ठेवण्याचा प्रयत्न झाला होता. दरम्यान, आता छगन भुजबळ यांचा ताफा हा सिल्हर ओकवर पोहोचला असून, भुजबळ-पवारांच्या या भेटीमागे काय दडलंय. हे पहावं लागणार आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम