Sharad Pawar | राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाला ‘तुतारी’

0
15
Sharad Pawar
Sharad Pawar

Sharad Pawar | राष्ट्रवादीच्या गोटातून एक मोठी बातमी समोर आली आहे. यानुसार राष्ट्रवादी शरद पवार गटाला नवे पक्ष चिन्ह मिळाले आहे. याआधी निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस हे नाव आणि पक्षाचे चिन्ह असलेले घडयाळ हेदेखील अजित पवार आणि त्यांच्या गटाला बहाल केले होते. त्यामुळे शरद पवार यांना मोठा धक्का बसला होता. दरम्यान, आता शरद पवारांना नवे पक्ष चिन्ह मिळाले असून, या चिन्हावर ते आगामी निवडणुका लढवणार आहेत. येणाऱ्या लोकसभा निवडणूकीत आता शरद पवारांच्या गटाला ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार’ हे नाव देण्यात आले असून, आता नवे ऐतिहासिक चिन्हही मिळाले आहे. (Sharad Pawar)

 सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाने शरद पवार गटाला लवकरात लवकर चिन्ह देण्याचे आदेश दिले होते. तर, शरद पवार गटाकडून कपबशी, वटवृक्ष व तुतारी असे तीन पर्याय देण्यात आले असून, यापैकी ‘तुतारी’ हे चिन्ह शरद पवार गटाला ‘तुतारी’ हे चिन्ह देण्यात आले आहे. याबाबत शरद पवार गटाने सोशल मीडियावर माहिती दिली असून, आता आगामी निवडणूकांमध्ये शरद पवार यांच्या पक्षाचं नाव हे ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार’ आणि चिन्ह ‘तुतारी’ हे असणार आहे. दरम्यान, आता ही तुतारी येणाऱ्या निवडणूकांमध्ये ही तुतारी यशस्वी ठरणार हे पहावे लागणार आहे. (Sharad Pawar)

NCP Sharad Pawar | राष्ट्रवादी शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार..?

Sharad Pawar | दिल्लीच्या तख्ताला हादरवण्यासाठी ‘तुतारी’ सज्ज 

“महाराष्ट्र राज्याच्या इतिहासात छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्यानं ज्या तुतारीने दिल्लीच्या तख्ताच्या कानठळ्या बसवलेल्या होत्या, तिच ‘तुतारी’ आज पक्षाला निवडणूक चिन्ह म्हणून निश्चित होणं ही ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष- शरदचंद्र पवार’ गटासाठी अत्यंत गौरवास्पद बाब आहे. महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, राजर्षी शाहू महाराज, आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुरोगामी विचारांनी, आणि आदरणीय खा. शरदचंद्र पवार साहेबांच्या साथीने आता दिल्लीच्या तख्ताला हादरवून सोडण्यासाठी हीच ‘तुतारी’ पुन्हा एकदा एकदा रणशिंग फुंकण्याकरिता सज्ज आहे.” अशी पोस्ट राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून सोशल मिडियावर करण्यात आली आहे. (Sharad Pawar)

Vanchit Bahujan Aghadi | वंचितचे कार्यकर्ते आक्रमक; तूफान राडा तर, पोलिसांकडून बळाचा वापर

शरद पवार गटाने हे ऐतिहासिक ‘तुतारी’ हे चिन्ह निवडणुक चिन्ह म्हणून स्वीकारले असून, याद्वारे त्यांनी आगामी निवडणुकांचे रणशिंग फुंकले आहे. दरम्यान, आता शरद पवारांची ही तुतारी येणाऱ्या काळात किती प्रभावी ठरते आणि येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत ही तुतारी विजयाची तुतारी ठरणार का? हे पहावे लागणार आहे. (Sharad Pawar)


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here