Manohar Joshi | शिवसैनिकांचे ‘सर’ काळाच्या पडद्याआड; महाराष्ट्राचा ‘कोहिनूर’ हरपला, मंत्री भुसेंची प्रतिक्रिया

0
47
Manohar Joshi
Manohar Joshi

Manohar Joshi |  राज्याच्या राजकारणातून एक अत्यंत दुखःद बातमी समोर आली असून, राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि बाळासाहेब ठाकरे यांचे कडवट शिवसैनिकाचं निधन झालं आहे. वयाच्या ८७व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. काल मध्यरात्री ३ वाजता मुंबईच्या हिंदुजा रुग्णालयात उपचारा दरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांना तातडीने हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. (Manohar Joshi)

तसेच, काही महिन्यांपूर्वी देखील मनोहर जोशी यांना ब्रेन हॅमरेजचा त्रास होता. त्यावेळीही त्यांना हिंदुजा रुग्णालयात दाखल केलेलं होतं. त्यानंतर त्यांची प्रकृती स्थिर होती. तर, प्रकृती अस्वास्थामुळे गेल्या अनेक दिवसांपासून मनोहर जोशी हे सक्रीय राजकारणापासून दूर होते. (Manohar Joshi)

Sharad Pawar | राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाला ‘तुतारी’

Manohar Joshi | अशी आहे कारकीर्द 

मनोहर जोशी यांचा जन्म २ डिसेंबर १९३७ रोजी रायगड जिल्ह्यातील नांदवी या गावात झाला. १९९५ मध्ये ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पदी विराजमान झाले होते. सुसंस्कृत मात्र एका गरिब कुटुंबात जन्म झाल्यामुळे त्यांच्या वाटेला लहानपणापासूनच संघर्ष होता. वडिलांसोबत भिक्षुकी करून ते पैसे मिळवू लागले. तर, मनोहर जोशी यांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीत मुंबई महानगर पालिकेचे नगरसेवक, महापौर, विधान परिषद सदस्य, आमदार, राज्याचे मुख्यमंत्री, खासदार, केंद्रीय अवजड उद्योगमंत्री, लोकसभा अध्यक्ष व राज्यसभा सदस्य अशी विविध पदे भूषविली आहेत. (Manohar Joshi)

शिवसैनिक ते मुख्यमंत्री 

मनोहर जोशी हे मूळचे बीडचे असून, शिक्षणासाठी ते मुंबईत स्थलांतरित झाले. त्यानंतर त्यांनी शिक्षण पूर्ण केल्यानंतर मुंबई महानगरपालिकेत अधिकाऱ्याची नोकरी मिळवली. यानंतर ते मुंबईत स्थायिक झाले. काही काळानंतर ते बाळासाहेब ठाकरेंच्या संपर्कात आले आणि त्यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी शिवसेनेत काम सुरू केलं. १९९५ साली राज्यात युतीची सत्ता असताना मनोहर जोशी हे राज्याचे मुख्यमंत्री झाले. मात्र, गेल्या काही काळापासून ते आजारपणामुळे राजकारणात सक्रिय नव्हते. (Manohar Joshi)

Vanchit Bahujan Aghadi | वंचितचे कार्यकर्ते आक्रमक; तूफान राडा तर, पोलिसांकडून बळाचा वापर

बंडानंतर एकनाथ शिंदेंनी घेतली होती भेट

शिवसेनेत फुट पडल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या काळात, त्यांच्या नेतृत्वाखाली तयार झालेल्या राज्यातील काही ज्येष्ठ नेत्यांची भेट घ्यायला सुरूवात केली होती. त्यावेळी “आम्ही पक्षातील जुन्या जाणत्या नेत्यांना विसरलेलो नसून, त्यांच्या गाठीभेटी घेत त्यांची विचारपूस करत असल्याचे दाखवण्याचा एकनाथ शिंदे यांचा हेतू होता. त्यावेळी शिंदे यांनी मनोहर जोशींची भेट घेतली होती. (Manohar Joshi)

महाराष्ट्राचा ‘कोहिनूर’ हरपला – मंत्री भुसे

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी सर यांचं निधन झाल्याची बातमी धक्कादायक आहे. आजची पहाट आम्हा शिवसैनिकांसाठी दुःखद आहे ! माझ्यासारख्या सर्वसामान्य शिवसैनिकासाठी सर नेहमीच मार्गदर्शक म्हणून पाठीशी उभे राहिले, महाराष्ट्राचा ‘कोहिनूर’ आपल्यातून हरपला. मुख्यमंत्री तसेच लोकसभा सभापती म्हणून सरांचे कार्य नेहमीच प्रेरणादायी राहिले आहे. शिवसेनेच्या पहिल्या फळीचे नेते म्हणून पक्ष उभा करण्यात त्यांनी दिलेले योगदान मोठे व अनमोल आहे, आम्ही शिवसैनिक ते योगदान कधीही विसरू शकत नाहीत. विशेष म्हणजे शिवसेनेचा झंझावात हा ‘शिवसेना काल-आज-उद्या’ या पुस्तक रुपात त्यांनी भावी पिढीसमोर मांडण्याचे मोठे कार्य केले आहे. परमेश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो. अखेरच्या श्वासा पर्यंत शिवसैनिक म्हणुन जोशी सरांनी आपले कार्य केले, सरांना विनम्र अभिवादन..!

दादाजी भुसे, पालकमंत्री नाशिक


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here