Shantigiri Maharaj | निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शांतिगिरी महाराजांचे आठ दिवसांचे अनुष्ठान..?

0
7
Shantigiri Maharaj
Shantigiri Maharaj

Shantigiri Maharaj |  आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नाशिकचे राजकीय वातावरण सध्या चांगलेच तापताना दिसत आहे. महायुतीच्या इच्छुकांची यादी ही दिवसेंदिवस वाढतच चाललीय. तर दुसरीकडे, नशिक लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढवण्यावर ठाम असलेले शांतिगिरी महाराज हे सध्या अपक्ष निवडणूक लढवण्याची तयारी करताना दिसताय.

आधी शांतीगिरी महाराज हे महायुतीकडून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते. श्रीकांत शिंदेंनी हेमंत गोडसेंच्या नावाची घोषणा केल्यानंतर त्यांनी महाविकास आघाडीकडून तिकीट मिळवण्याचा प्रयत्न केला होता. दरम्यान, हे दोन्ही पर्याय आजमावून झाल्यानंतर आता शांतीगिरी महाराजांनी ‘एकला चलो रे’ची भूमिका घेतली आहे. यासाठी त्यांनी आठ दिवसांचे अनुष्ठानही केले असून, या अनुष्ठानानंतर आता शांतीगिरी महाराज हे लोकसभा निवडणुकीच्या मैदानात पूर्ण ताकदीने उतरणार आहेत. (Shantigiri Maharaj)

Shantigiri Maharaj | शांतिगिरी महाराजांच्या एन्ट्रीने नाशिकचे राजकीय वातावरण तापले

Shantigiri Maharaj | शांतिगिरी महाराजांचं त्र्यंबकला शक्तीप्रदर्शन 

दरम्यान, शांतीगिरी महाराजांच्या या अनुष्ठानाची सांगता आज त्र्यंबकेश्वरमध्ये झाली असून, यावेळी त्यांनी त्र्यंबकेश्वरमध्ये जोरदार शक्तीप्रदर्शन केलं आहे. आज सकाळी त्र्यंबकेश्वर शहरातून त्यांनी हजारो भक्तांच्या उपस्थितीत टाळ मृदुंगाच्या तालावर हातात भगवे झेंडे घेऊन यात्रा काढली. यावेळी यात्रेत सामील झालेल्या भक्तांच्या हातात ‘आता लढायचं आणि जिंकायचंच’, ‘खूप केलं नेत्यांसाठी, आता लढू बाबांसाठी’ अशा आशयाचे फलक होते.(Shantigiri Maharaj)

तर, आगामी लोकसभा निवडणूका या शांततेत आणि यशस्वीरित्या पार पडावी यासाठी शांतीगिरी महाराजांनी हे अनुष्ठान केले असल्याची माहिती जय बाबाजी भक्त परिवाराकडून देण्यात आली आहे. यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही अशा प्रकारे केदारनाथला जाऊन अनुष्ठान करत निवडणूक लढवली होती. तसेच आता नाशिकमधून शांतीगिरी महाराजांनी देखील अनुष्ठान करून आता त्र्यंबकेश्वरमधून लोकसभेचे रणशिंग फुंकले आहे.

Shantigiri Maharaj | शांतीगिरी महाराज नाशिकमधून लढवणार लोकसभा निवडणुक..?

अनेक उमेदवारांनी निवडणुकीसाठी घेतले महाराजांचे  आशीर्वाद

शांतीगिरी महाराजांचा छत्रपती संभाजीनगर आणि नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणात भक्तपरिवार आहे. याआधी त्यांनी छत्रपती संभाजीनगरमधून निवडणूक लढवली होती. मात्र, तिथे त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता. यानंतर आता त्यांनी नाशिक लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे.(Shantigiri Maharaj)

जिल्ह्यात बाबांचा भक्तपरिवार मोठ्या प्रमाणात असून, त्यांचे मूळ गावही नाशिक जिल्ह्यातीलच आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शांतीगिरी महाराज यांचे आशीर्वाद आणि पाठिंबा मिळवण्यासाठी अनेक नेते त्यांच्या भेटी घेत आहेत. धुळे लोकसभेचे भाजपचे विद्यमान खासदार आणि उमेदवार डॉ. सुभाष भामरे, दिंडोरी लोकसभेच्या भाजपच्या उमेदवार आणि विद्यमान खासदार डॉ. भारती पवार, शरद पवार गटाचे दिंडोरी लोकसभेचे उमेदवार भास्कर भगरे यांच्यासह अनेक उमेदवारांनी आतापर्यंत शांतिगिरी महाराजांची भेट घेत आशीर्वाद घेतले होते.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here