Sex Racket | मुलगी, जावयाच्या मदतीने सासूच चालवायची सेक्स रॅकेट

0
15
Sex Racket
Sex Racket

Sex Racket | छत्रपती संभाजीनगर ह्या जिल्ह्यातून सतत महिलांवरील अत्याचाराच्या घटना या समोर येत असतात. गेल्या महिन्यातच तब्बल पाच घटना उघडकीस आल्या होत्या. दरम्यान, यातच आता आणखी एक धक्कादायक घटना उघडकीस आली असून, या घटनेत सासूच लेक आणि जावयाच्या मदतीने वेश्याव्यवसाय करत असल्याचे प्रकरण समोर आले आहे. गेल्या काही दिवसांपासून शहर पोलिसांकडून यासाठी धडक कारवाया करत असत असून, याअंतर्गत हे प्रकरण उघडकीस आले आहे. छत्रपती संभाजी नगर शहरातील सातारा परिसरात असलेल्या एका फ्लॅटमध्ये महिलांकडून वेश्याव्यवसाय करून घेणाऱ्यांना अटक करण्यात आली आहे.(Sex Racket)

Crime News | प्रेयसीच्या अश्लील व्हिडीओचं मेमरीकार्ड प्रत्येक घरासमोर ठेवलं

Sex Racket | नेमकं प्रकरण काय..?

अधिक माहितीनुसार, मुलगी आणि जावयाच्या मदतीने सासूच हा सेक्स रॅकेट चालवत होती. या प्रकरणी शरद संजय साबळे (वय २९ वर्ष), त्याची पत्नी रोहिणी शरद साबळे (रा. मूळ- नवेगाव, जि. जळगाव, ह.मु. उमा गोपालनगर, सातारा) तसेच माधुरी सुरेश थोरात (रा. विटखेडा) या सासू आणि लेक जावयाला ताब्यात घेण्यात आले आहे.

परिमंडळ दोनचे उपायुक्त नवनीत कॉवत यांना सातारा परिसरात सीआर रेसिडेन्सी येथील एका फ्लॅटमध्ये वेश्याव्यवसाय केला जात असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी चौकशीसाठी पथक नेमून कारवाई करण्याचे निर्देश दिले. दरम्यान, वेश्याव्यवसाय सुरु असल्याची खात्री करण्यासाठी संबंधित पथकाने आधी खोटे ग्राहक पाठविले. त्यानुसार हा ग्राहक गेला असता, त्याला आत महिला असल्याचे दिसताच त्याने पथकाला इशारा केला. त्यानंतर पथकाने तेथे छापा टाकला. (Sex Racket)

Trunmul Congress | पक्ष कार्यालयात महिलांवर अत्याचार; आरोपी नेता फरार

पाचशे रुपये मिळायचे…

याठिकाणी पथकाने छापा टाकला असता, त्यांना आरोपी रॅकेट चालवत असलेले साबळे पती पत्नी हे सोफ्यावर बसलेले असल्याचे आढळले. तर आत बेडरुमध्ये पोलिसांनी पाठवलेला डमी ग्राहक आणि एक महिला अर्धनग्न अवस्थेत आढळून आले. या महिलेची पोलिसांनी चौकशी केली असता, “आर्थिक अडचण असून, एका व्यक्तीसोबत शारीरिक संबंध ठेल्यानंतर साबळे हे पाचशे रुपये देणार” असल्याचे पोलिसांना सांगितले.(Sex Racket)

दरम्यान, यानंतर पोलिसांनी आरोपी जोडप्याची कसून चौकशी केली असता, त्याने त्याची सासू माधुरी थोरात हिच्या घरी वेश्या व्यवसायाच्या उद्देशयाने ठेवलेल्या आणखी काही महिला असून, ग्राहकांच्या मागणीनुसार ती आपल्याला महिला पुरवत असल्याचे सांगितले. यानंतर पोलिसांच्या पथकाने विटखेडा येथे माधुरीच्या घरी छापा टाकला असून, तेथे चार महिला होत्या. पोलिसांनी या आरोपींना ताब्यात घेतले असून, या पाच पीडित महिलांची सुटका केली आहे. (Sex Racket)


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here