Deola | रौद्रशंभु ट्रेकर्सकडून गेल्या पाच वर्षांपासून गडकिल्ले संवर्धन करून शिवजयंती साजरी

0
52
Deola
Deola

सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा | शिवजयंतीला मोठ्या प्रमाणावर होणारी फटाक्यांची आतषबाजी, मिरवणुकीत ढोल, ताशा व डिजेचा तालावर नाचून शिवजयंती साजरी होत असतांना याला फाटा देत चांदवड व निफाड तालुक्यातील काही तरुणांनी एकत्र येत शिवरायांना ३९४ व्या जयंतीनिमित ऐतिहासिक अशा चांदवड व देवळा तालुक्याच्या हद्दीत असलेल्या धोडप किल्ल्यावर स्वछता मोहीम राबवित आणि “हर हर महादेव” चा गजर करत शिवजयंती साजरी केली.(Deola)

Deola | देवळा तालुका खरेदी विक्री संघाच्या चेअरमन पदी संजय गायकवाड यांची निवड

ह्या ठिकाणी गेल्या पाच वर्षांपासून गड कोट किल्ले संवर्धन करून शिवजयंती साजरी होत आहे. यावेळी रौद्रशंभु ट्रेकर्सचे सर्व शिलेदार व उत्सव समितीचे सर्व सदस्य उपस्थित होते. आज महाराष्ट्रातील किल्ले शेवटच्या घटका मोजत आहेत. किल्ले संवर्धनाचे महत्व सर्वांपर्यंत पोहचावे आणि पुन्हा एकदा शिवकाळातील शिवजन्मोस्तव कसा असेल ह्यासाठी रौद्रशंभु ट्रेक्कर्स धोडप शिवजन्मोस्तव समिती मागच्या ४ वर्षांपासून सोहळा साजरा करीत आहे.(Deola)

Deola | खर्डे येथे शिवजयंती निमित्ताने जय्यत तयारी; विविध कार्यक्रमांचे आयोजन

ह्या वर्षी देखील धोडप किल्ल्यावर शिवजयंती मोठया उत्साहात साजरी करण्यात आली. याप्रसंगी रौद्रशंभु ट्रेकर्सचे सर्व सदस्य उपस्थित होते. शिवजयंतीच्या पूर्व संध्येला किल्ल्यावर दीपोत्सव मोहीम आणि दुसऱ्या दिवशी सकाळी पालखी मिरवणूक काढून उपस्थितांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.(Deola)


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here