सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा | आईवडिलांच्या पुण्याईने, व माता नर्मदाच्या इच्छेने खर्डे (ता. देवळा) येथील प्रगतशील शेतकरी ह.भ.प भाऊसाहेब मोरे, किसन देवरे यांची पायी नर्मदा परिक्रमा ही दि. २ नोव्हें ते दि. १६ फेब्रुवारी अशी एकूण १०५ दिवसात पूर्ण झाल्याने, त्यांच्या कुटूंबियांनी खर्डे येथे रविवारी (दि. १८ फेब्रुवारी) रोजी ‘नर्मदा जल पूजन’ व ‘कन्या पूजन’ कार्यक्रम आयोजित केला होता.
Deola | रौद्रशंभु ट्रेकर्सकडून गेल्या पाच वर्षांपासून गडकिल्ले संवर्धन करून शिवजयंती साजरी
यावेळी संपूर्ण गावातून टाळ मृदूंगाच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. ठिकठिकाणी महिलांनी त्यांचे औक्षण केले. त्यानिमित्ताने सकाळी १० वाजता ह.भ.प श्री स्वात्मा नंदनपुरुजी महाराज, (ब्रम्हगिरी सन्यास आश्रम, त्रंबकेश्वर) यांचे प्रवचन आयोजित करून महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. यावेळी नातेवाईक, हितचिंतक, गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम