Deola | खर्डे येथे शिवजयंती निमित्ताने जय्यत तयारी; विविध कार्यक्रमांचे आयोजन

0
54
Deola
Deola

सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा |  खर्डे ता देवळा येथे शिवजयंती निमित्ताने जय्यत तयारी करण्यात आली असून, संपूर्ण गावांत भगवे झेंडे लावून गाव भगवेमय करण्यात आले आहे. ग्रामदैवत श्रीराम मंदिर समोर साजरी करण्यात येणाऱ्या शिवजयंतीसाठी या परिसरात विद्युत रोषणाई करण्यात आली असून मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी करण्यात येणार असल्याची माहिती सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीने दिली.

 कार्यक्रम पुढील प्रमाणे – 

सोमवारी दि. १९ –

शिवजन्मोत्सव सोहळा सकाळी सात ते सायंकाळी आठ वाजेपर्यंत (दिपोत्सव सायंकाळी ७ ते रात्री ९वाजता ),

मंगळवारी दि. २० –

सकाळी ९ ते १२ हनी बनी इंग्लिश मिडीयम स्कुलच्या विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम. शिरीष जाधव ( माजी पोलीस उप-अधीक्षक) यांचा सायंकाळी सात वाजता अंधश्रद्धेवर आधारित जादूचा जनजागृती कार्यक्रम.

बुधवार दि. २१ –

सायंकाळी सात वाजता भजन संध्या, भजनी मंडळी खर्डे (वा.)

गुरुवारी दि. २२ –

सायंकाळी सात वाजता ह.भ.प. सतीश महाराज डोईफोडे, शंकर गड सिंदखेड राजा (शिव कीर्तनकार) यांचा कार्यक्रम शुक्रवारी दि. २३ रोजी सायंकाळी सात वाजता ह.भ.प. अविनाश महाराज, लोहोणेर यांचे संगीत प्रवचन,

शनिवारी दि.२४ –

सायंकाळी सात वाजता संदीप पवार (चांदवडकर) यांचे शिवप्रवचन

रविवारी दि. २५ –

सायंकाळी सात वाजता प्राध्यापक पंकज गांगुर्डे यांचे व्याख्यान आदी कार्यक्रम आयोजित करण्यात आले असून, या भव्य दिव्य अशा कार्यक्रमाचा खर्डे व परिसरातील नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here