ज्येष्ठ पत्रकार, लेखक, विचारवंत संजय आवटे यांचा ‘महात्मा फुले समता’ पुरस्काराने होणार गौरव

0
12

अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने महात्मा फुले पुण्यतिथीच्या दिवशी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष छगन भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली दिला जाणारा ‘समता पुरस्कार’ यावर्षी ज्येष्ठ पत्रकार, लेखक, विचारवंत संजय आवटे यांना देण्यात येणार आहे. या पुरस्करामध्ये रुपये एक लक्ष, फुले पगडी, मानपत्र शाल आणि स्मृतीचिन्ह यांचा समावेश आहे. सदर पुरस्कार दि. २८ नोव्हेंबर २०२३ रोजी सकाळी ९.३० वाजता समता भूमी, फुले वाडा, पुणे येथील कार्यक्रमात प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या महिला प्रदेशाध्यक्ष मंजिरी धाडगे, विभागीय अध्यक्ष प्रीतेश गवळी, शहर अध्यक्ष पंढरीनाथ बनकर, महिला शहर अध्यक्ष वैष्णवी सातव यांनी दिली आहे.

Nashik | वारंवार आवाहन करूनही ऐकलं नाही; शिवमहापुराण कथेत 52 लाखांचे दागिने चोरीला

या सोहळ्यासाठी सामाजिक व राजकीय क्षेत्रातील विविध मान्यवर तसेच समता परिषदेचे पदाधिकारी व राज्यभरातून समता सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहे. अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने दरवर्षी महात्मा फुले पुण्यतिथी समता दिनाच्या निमित्ताने ‘महात्मा फुले समता पुरस्कार’ सामाजिक, राजकीय, साहित्य, पत्रकारिता यासारख्या विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या व्यक्तींना देण्यात येतो.

यापुर्वी हा पुरस्कार कोणा-कोणाला झाला प्रदान?

या अगोदर माजी केंद्रीय कृषीमंत्री खा. शरदचंद्र पवार, माजी केंद्रीय मंत्री विरप्पा मोईली, खा.शरद यादव, छत्तीसगढ राज्याचे मुख्यमंत्री भूपेश बघेल, ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर, ज्येष्ठ विचारवंत रावसाहेब कसबे, ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव, ज्येष्ठ लेखक डॉ.भालचंद्र नेमाडे, डॉ.बी.एल.मुणगेकर, लेखिका अरुंधती रॉय, प्रा.डॉ.मा.गो.माळी, ज्येष्ठ साहित्यिक फादर फ्रान्सिस दिब्रिटो, ज्येष्ठ कवी समीक्षक यशवंत मनोहर, डॉ. तात्याराव लहाने, कै.प्रा.हरी नरके यांच्यासह अनेक दिग्गजांचा समता पुरस्काराने गौरव करण्यात आलेला आहे.

Crime news | कैद्याच्या पोटात महिन्यात दुसऱ्यांदा आढळली चावी

यंदाच्या वर्षी हा पुरस्कार मिळालेले संजय आवटे आहेत तरी कोण?

यंदाच्या वर्षी या पुरस्कारासाठी ज्येष्ठ पत्रकार, लेखक, विचारवंत संजय आवटे यांची निवड करण्यात आली आहे. श्री. संजय आवटे यांचे मराठी पत्रकारिता आणि साहित्य क्षेत्रात अग्रक्रमाने नाव घेतल जाते. ते लेखक तसेच पत्रकार म्हणून महाराष्ट्रभर सुपरिचित आहेत. आजवर त्यांनी दिव्य मराठी, लोकसत्ता, सकाळ, लोकमत, कृषीवल, पुढारी, साम टीव्ही इत्यादी दैनिक आणि चॅनलमध्ये महत्वाच्या पदावर काम केले असून ते सध्या पुणे लोकमतच्या संपादक पदावर कार्यकर्त आहे. श्री. संजय आवटे यांनी आम्ही भारताचे लोक, गेम ऑफ थ्रोन्स, बराक ओबामा या गाजलेल्या पुस्तकासह दहा हुन अधिक ग्रंथांचे त्यांनी लेखन केले आहे. स्पष्ट, परखड पत्रकार व तत्त्वज्ञानाचे अभ्यासक म्हणून त्यांना महाराष्ट्रभर ओळखले जाते. साहित्य व सामाजिक क्षेत्रातील मानाचे व सन्मानाचे ५० हुन अधिक पुरस्कार त्यांच्या नावे आहेत. संजय आवटे हे संवेदनशील मनाचे आणि ऐतिहासिक लेखन करणारे साहित्यिक व समीक्षक म्हणून ओळखले जातात. श्री. संजय आवटे हे वास्तववादी लेखन करणारेही लेखक आहेत. त्यांनी आपल्या कार्यातून महात्मा जोतीराव फुले, सावित्रीबाई फुले व डॉ.बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांचा सामाजिक वारसा विकसित केला. त्यांनी केलेल्या अलौकिक कार्याची दखल घेत त्यांना अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने सन २०२३ चा मानाचा ‘समता पुरस्कार’ देऊन गौरविण्यात येत आहे.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here