Skip to content

जिवाशी खेळाल तर ट्रॅव्हल्सच्या बस जप्त; पोलीस आयुक्त नाईकनवरे यांचा ट्रॅव्हल्स व्यावसायिकांना इशारा

New Rule

द पॉईंट नाऊ: कायद्याच्या चौकटीत राहून ट्रॅव्हल्स व्यावसायिकांनी व्यवसाय करावा. चालकांकडे बोट दाखवून स्वतः जबाबदारी झटकून नामानिराळे राहण्याचा प्रयत्न केल्यास खपवून घेतले जाणार नाही. प्रवासी वाहतूक करताना नियमांचे उल्लंघन होत असल्याचे आढळून आल्यास थेट बस जागेवरून जप्त करण्यात येईल, असा रोखठोक इशारा पोलीस आयुक्त जयंत व्यावसायिकांना दिला.

नाईकनवरे यांनी टॅव्हल्स नाशिक-औरंगाबाद रस्त्यावरील कैलासनगर चौकात शनिवारी (दि.८) पहाटेच्यासुमारास झालेल्या खासगी ट्रॅव्हल्स बस व ट्रकच्या भीषण अपघातात बाराजणांचा होरपळून मृत्यू झाला. या अपघाताची दखल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री दादा भुसे यांनी घेत सखोल चौकशीचे आदेश दिले भुसे यांनी घेतलेल्या आढावा बैठकीनंतर नाईकनवरे यांनी मुख्यालयातील सभागृहात शहरातील विविध ट्रॅव्हल्स व्यावसायिक, टुर ऑपरेटरची बैठक बोलाविली होती. या बैठकीला प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रदीप शिंदे, वाहतूक नियंत्रण शाखेच्या उपायुक्त पौर्णिमा चौगुले, विजय खरात, अमोल तांबे, महापालिकेचे शहर अभियंता शिवकुमार वंजारी आदी व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी बोलताना नाईकनवरे म्हणाले, रस्त्यांवर केवळ बसेस चालवायच्या आणि नियम-कायदे धाब्यावर बसवून लोकांचा जीव धोक्यात टाकायचा, है सहन केले जाणार नाही.

आसनक्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक होत असल्याचे आढळून येताच बस थेट जप्त केली जाईल तसेच एका शहरापासून दुसऱ्या शहरापर्यंतच्या प्रवासात बसमध्ये रस्त्यातून प्रवाशांचा भरणा जर चालक करत असेल, तर त्यावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी ही त्या ट्रॅव्हल्स मालकाची आहे. मात्र असे होत नाही, कारण मालक चालकाला कमी पगार देतो आणि जादा प्रवाशांची वाहतूक करत ‘वरकमाई’चा सल्ला देऊन जबाबदारी झटकतो. त्यामुळे हे दोघांच्या संगनमताने घडत असल्याचे नाईकनवरे यांनी यावेळी सांगितले. बैठकीला दिलीपसिंह बेनिवाल, योगेश रमेश दायमा, अशपाक खान, राम अवतार चौधरी, राजेंद्र इंदाणी, मयूर राजपूत आदी उपस्थित होते.

 

नाईकनवरे यांचे ट्रॅव्हल्सचालकांना थेट प्रश्न…

● ट्रॅव्हल्स कंपनी चालविणाऱ्यांनी आपल्या चालकांनाही अधिकृतरित्या प्रशिक्षण द्यावे, चालकांच्या आरोग्यावर खर्च करावा, केवळ तत्त्वांशी तडजोड तुम्ही लोक व्यावसायासाठी का करतात? चालकांना डेडलाईन सांगून आमिष का दाखवतात? बसच्या मागे चालकाच्या रॅश ड्रायव्हिंग व जादा प्रवासी वाहतु कीबाबत थेट संपर्क करण्याचे आवाहन का लिहित नाही? हे लिहिण्यास काही अडचण किंवा खर्च लागणार आहे का?

● ए टू बी अशाप्रमाणे प्रवासी वाहतूक करण्याची परवानगी आहे, मग रस्त्यात प्रवाशांचा भरणा कशासाठी?

● व्यावसायिक फायद्यासाठी तत्त्वांशी तडजोड कशासाठी करता? सरकारी यंत्रणाच उपाययोजना करणारच आहे. मात्र आपणदेखील या

● दुर्घटनेतून काही बोध घेणार आहात का?
बारा प्रवाशांचा होरपळून झालेल्या मृत्यूनंतरसुद्धा आपण आत्मपरीक्षण करणार नाही का? तुम्ही आणि जे मृत्युमुखी पडले तेसुद्धा माणसंच होती ना?

 

सुरक्षित प्रवासी वाहतुकीसाठी प्रयत्नशील

● बसचालकांचे वेळोवेळी समुप देशन करण्यात येईल तसेच बसेसमध्ये अग्निप्रतिअवरोधक यंत्रे, तसेच सीसीटीव्ही कॅमेरेसुद्धा लावण्याबाबत सर्व ट्रॅव्हल्स कंपन्यांना सांगण्यात येईल, असे यावेळी व्यावसा यिकांनी सांगितले. सुरक्षित प्रवासी वाहतूक करण्यासाठी आम्ही सगळे प्रयत्नशील राहू, अशी ग्वाही यावेळी ट्रॅव्हल्स व्यावसायिकांकडून बैठकीत देण्यात आली.

● बसमधून प्रवास करणाऱ्या सर्व प्रवाशांची नावे व तप शीलवार आवश्यक माहितीची नोंद ठेवली जाईल. तसेच चालक रस्त्यात जादा प्रवासी भरणार नाही, यासाठी आम्ही त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी उपाय शोधू, असेही काही व्यावसायिकांनी सांगितले.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!