Skip to content

Sarvtirth taked: अधरवड येथे नाविन्यपूर्ण योजनेतून महिला बचत गट नूतन उद्योग केंद्र इमारतीचे भूमिपूजन


Sarvtirth taked : इगतपुरी तालुक्यातील ग्रामपंचायत अधरवड येथे नुकतेच जि प नाविन्यपूर्ण योजनेतून महिला बचत गट उद्योग केंद्र इमारतीचे भूमीपूजन संपन्न झाले. गावातील महिला बचत गटांतील महिला माता बघिणींना स्वयंरोजगार उपलब्ध व्हावा व त्यासाठी त्यांना हक्काचे गोडाऊन उपलब्ध व्हावे यासाठी अधरवड येथील महिलांनी जि प सदस्य हरिदास लोहकरे यांच्याकडे बारशिगवे येथे अपंग बांधवांसाठी साकार झालेल्या अपंग बांधव उद्योग केंद्राच्या धर्तीवर अधरवड गावातही महिला बचत गटांसाठी उद्योग केंद्र उपलब्ध करून मिळावे अशी मागणी काही महिन्यांपूर्वी केली होती. (Sarvtirth taked)

Deola Rain: देवळा तालुक्यात दहीवडसह काही भागात गारपीट

या महिलांच्या मागणीला जि प सदस्य हरिदास लोहकरे यांनी सामाजिक जाणिवेतून हिरवा कंदील दर्शविला व लगेचच जिल्हाधिकारी नाशिक यांच्याकडे जिल्हा परिषद जिल्हा नियोजन समितीच्या मार्फत पत्रव्यवहार करून अधरवड येथे नाविन्यपूर्ण योजनेतून महिला सबलीकरणासाठी महिला सक्षमीकरण करण्यासाठी पंचवीस लक्ष रुपयांचे महिला बचत गट उद्योग केंद्र मंजूर केले या मंजूर केलेल्या उद्योग केंद्र इमारतीचे नुकतेच भूमिपूजन संपन्न झाले.यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवसेना ठाकरे गट जिल्हाध्यक्ष निवृत्ती पाटील जाधव,जि प सदस्य हरिदास लोहकरे, काँग्रेसचे जेष्ठ नेते पंढरी पाटील बरे, सरपंच ज्ञानेश्वर डमाळे, सामाजिक कार्यकर्ते राम शिंदे, गोरख पगारे, उपसरपंच मीराबाई बरे, शिवसेना ठाकरे गट युवासेना तालुका प्रमुख मोहन बरे, सुनिल पगारे, निनावी सरपंच गणेश टोचे, बारशिगवे उपसरपंच पोपट लहामगे, आर पी आयचे प्रकाश झनकर, बहिरू केवारे, नवनाथ बरे, सुदाम भोसले, संदीप महाले, भास्कर वाजे, बाळू वाजे, रामदास वाजे, माजी सरपंच बहिरू गांगड,सुनील भाऊ पगारे, डॉ घनश्याम बरे, कैलास भांगरे प्रभाग समन्वयक, विष्णू भाऊ रण, सागर पांडे,ठेकेदार नंदू भाऊ बरे, अशोक बरे आदींसह बहुसंख्य ग्रामस्थ मान्यवर महिला माता बघिणी यावेळी उपास्थित होते. (Sarvtirth taked)

या नूतन महिला उद्योग केंद्र इमारतीच्या कामाचा नारळ वाढवून कुदळ मारून शुभारंभ केल्यानंतर गावातील गवळी बाबा मंदिरात कार्यक्रम संपन्न झाला. देवी सरस्वती मातेचे पूजन करून व शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांचा सत्कार करण्यात आला व या कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. (Sarvtirth taked)

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी निवृत्ती पाटील जाधव होते तर व्यासपीठावर जि प सदस्य हरिदास लोहकरे, पंढरी बरे, राम शिंदे, ज्ञानेश्वर डमाळे, गणेश टोचे, पोपट लहामंगे ,गोरख पगारे, प्रकाश आंबेडकर, नवनाथ बरे, सुदाम भोसले, रामदास वाजे, बहिरू केवारे आदींसह प्रमुख मान्यवर अधरवड ग्रामस्थ उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन अंगणवाडी सेविका मंगल डोळस, योगिता बरे यांनी केले.

आजची महिला ही सक्षम झाली पाहिजे, त्यांचे सबलीकरण झाले पाहिजे त्यांच्या हाताला रोजगार कसा मिळवून देता येईल यासाठी त्यांचे जीवनमान उंचावले पाहिजे यासाठी आम्ही सर्व प्रयत्नशील असू लवकरच हे महिला उद्योग केंद्र इमारतीचे चांगल्या प्रतीचे दर्जाचे काम उभे राहिल गावातील महिलांनी देखील उभ राहून हे काम करून घ्या काही अडचणी असल्यास तर संबंधित ठेकेदाराला सूचित करा,आणि या भव्य वास्तूचा लवकरच वापर करा येणाऱ्या काळातही आम्ही विविध पशुसंवर्धन विभागाच्या मार्फत विविधांगी योजना राबवू,महिला बचत गटांसाठी रोजगार उपलब्ध करून हा परिसर सक्षम बनविण्यासाठी प्रयत्न करू असे मान्यवरांपैकी जेष्ठ नेते पंढरी पाटील बरे, जि प सदस्य हरिदास लोहकरे, सामाजिक कार्यकर्ते राम शिंदे, अध्यक्षीय भाषण निवृत्ती पाटील जाधव यांनी आपापले मनोगतात व्यक्त केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सूत्रसंचालन मंगल डोळस यांनी केले.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!